चिखली तालुक्यातील पहिली ग्रामपंचायत सदस्य आनापोज होण्याचा विक्रम असोला बुद्रुक
चिखली (आपलं बुलढाणा जिल्हा बातमी) चिखली तालुक्यातील मौजे असोला बुद्रुक येथे ग्रामपंचायतचे सर्वत्र निवडणूक लागलेली आहे वार्ड नंबर एक आणि वार्ड नंबर तीन या दोन्ही ठिकाणी बिनविरोध सदस्य निवडून आले होते परंतु वार्ड नंबर दोन मध्ये अर्ज काढेपर्यंत सुद्धा एकमत न झाल्यामुळे अखेर आज दिनांक 01/ 11 /2023 रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक असोला येथे सर्व गावकरी एकत्र येऊन त्यांनी वार्ड नंबर दोन मधील तीन सदस्यांना निवडून देण्याचे ठरवले आहे त्यांच्या विरोधातील सदस्यांनी आपली मतभेटी बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्यामुळे अखेर असोला बुद्रुक येथील नऊ सदस्य ही बिनविरोध निवडून आलेले आहेत आता फक्त असोला बु येथे सरपंच पदाची निवडणूक होणार आहे त्यामध्ये फक्त आता दोनच सदस्य हे आपले नशीब आजमावणार आहे बिनविरोध सदस्य मध्ये वार्ड नंबर एक मध्ये सौ वैशाली संदेश राठोड सौ जया कपिल चव्हाण व. अनिल रूपा चव्हाण हे तीन सदस्य नंबर एक मधून बिनविरोध झालेले आहेत तर वार्ड नंबर दोन मधील साहेबराव पांडुरंग पवार सौ मनीषा आकाश कुमार राठोड शोभा गजानन गवई हे वॉर्ड नंबर दोन मधून समोरील उमेदवाराने मत पेटी बंद केल्यामुळे यांचा एकच अर्ज शिल्लक असल्यामुळे हे सुद्धा विजय झालेले आहे तर वॉर्ड नंबर तीन मधील उमेदवार समाधान बाळाजी नवले शरद अशोक गोलांडे व कडू खान हे उमेदवार असोला बुद्रुक येथुन बिनविरोध निवडून आलेले आहेत तर सरपंच पदाची उमेदवार दोनच असल्यामुळे खारी लढत ही दोघीमध्येच होणार आहे असोला बुद्रुक हे एस सी महिला असल्यामुळे येथे खरी लढत महिलांमध्येच होणार आहे त्यामध्ये निर्मला रायसिंग चव्हाण व मंदोदरी साहेबराव मस्के यांच्या मध्ये खरी लढत होणार असून संपूर्ण गावाचे नव्हे संपूर्ण तालुक्याचे लक्ष या ग्रामपंचायतकडे लागून आहे निवडून येणाऱ्या सरपंच पदाच्या उमेदवाराकडे आहे ग्रामपंचायत सदस्य असोला निवडून येण्यासाठी गावातील प्रतिष्ठित व्यक्ती व तांडा वस्तीतील प्रतिष्ठित व्यक्ती यांनी समाजाशी ची भूमिका घेऊन नऊच्या सहा सुद्धा ग्रामपंचायत सदस्य आनाफोज तर तिन सदस्य मतपेटी बंद करुन सर्व समाज पुढे एकतेची भावना निर्माण केली आहे असोला बुद्रुक येथे मुस्लिम समाज मराठी समाज आणि बंजारा समाज एकोपाणी वागून त्यांनी सर्व समाजाला एक संदेश दिला आहे आता खरी लढत ही सरपंच पदाच्या उमेदवारांमध्ये होणार आहे