शिवजयंती उत्सव समितीचा शिवसन्मान सोहळा
देशाला एकसंघ ठेवण्यात सरदार पटेलांचा मोठा वाटा-- डॉ. अशोकराव खरात
बुलढाणा- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी :- देश स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर असताना देशात अनेक राजे राजवाडे, संस्थाने होती. देशाचे पहिले गृहमंत्री झालेल्या सरदार पटेल यांनी मोठा निर्णय घेत पोलीस ऍक्शन द्वारा संस्थानांचे विलिनीकरण घडवून आणले. सरदार पटेल यांच्यामुळे देश एकसंघ राहिल्याचे प्रतिपादन जिल्हा बँकेचे मुख्याधिकारी डॉक्टर अशोक खरात यांनी केले.
शिवजयंती उत्सव समितीच्या विविध क्षेत्रातील मान्यवरांचा शिवसन्मान सोहळा तसेच सरदार वल्लभभाई पटेल व माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना अभिवादन असा संयुक्त कार्यक्रम शिवजयंती कार्यालयात आयोजित करण्यात आला होता यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य विष्णुपंत पाटील होते.
कार्यक्रमास शिवजयंती उत्सव समितीचे सचिव सुनील सपकाळ, एडवोकेट जयसिंग राजे, अनिल रिंढे, गणेश निकम, डॉक्टर वराडे, डॉक्टर मनोहर तुपकर, संजय खांडवे, प्रा. शाहीना पठाण, दीपक पाटील, जोशी काका, आदिती अर्बनचे शेजुळ साहेब, जगदेवराव बाहेकर, मराठा अर्बन चे जेऊघाले,डॉ. पुरुषोत्तम देवकर,वंचीतचे मिलिंद वानखेडे,सुरेश सरकटे,अनुजा सावळे, सुजित देशमुख, संदीप गावंडे, वैशाली तायडे, अमोल रिंढे, प्रशांत खासणे, प्रशांत सोनवणे,जिल्हा बँकेचे अधिकारी सोमनाथ इथापे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉक्टर खरात म्हणाले – सरदार वल्लभभाई पटेल आणि इंदिरा गांधी यांचे कार्य देशाला पुढे नेणारे आहे. इंदिरा गांधींनी बँकांचे राष्ट्रीयीकरण केले. तेव्हापासून खऱ्या अर्थाने गरिबी हटायला सुरुवात झाली. असे सांगून त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. तसेच देशातील 23 बँकांना सॉफ्ट लोण देण्यात आले. यातील राज्यातील तीन बँका आहेत. त्यात बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँक झपाट्याने प्रगती करीत असल्याच त्यांनी सांगितले. प्रास्ताविक प्रा. अनिल रिंढे यांनी केले. यामध्ये त्यांनी महापुरुषांच्या कार्याची माहिती दिली तर सुनील सपकाळ यांनी कार्यक्रमाची भूमिका मांडली. सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष डॉ. शोण चिंचोले व डॉक्टर मनोहर तुपकर यांनी शिवसन्मान होणाऱ्या मान्यवरांची माहिती दिली.आद्यक्षीय भाषणात प्राचार्य विष्णुपंत पाटील यांनी सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांच्या कार्याचे स्मरण केले. सन्मानपत्राचे वाचन गणेश निकम केळवदकर, वैशाली तायडे ,संजय खांडवे यांनी केले. संचलन गोपाल सिंग राजपूत यांनी तर आभार सुनील सपकाळ यांनी मानले.
यांचा झाला शिवसन्मान
सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल जिल्हा बँकेचे सीइओ डॉक्टर अशोक खरात यांना बेस्ट ऑडिट इनिसिटिव्ह अवार्डने सन्मानित करण्यात आले. याबद्दल त्यांना शिवजयंतीच्या वतीने शाल श्रीफळ व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. डॉक्टर शोण चिंचोले यांना मित्रपरिवार च्या वतीने सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. डॉक्टर चिंचोले यांनी आपला वैद्यकीय व्यवसाय सांभाळून सामाजिक बांधिलकी जोपासली. शिवजयंतीच्या माध्यमातून ते सामाजिक कार्य पुढे आहे.याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले. रवी पाटील ,सुरेश सरकटे ,सचिन किंनगे, माधव तायडे यांनाही शिवसमान पत्र देण्यात आले. जिल्हा बँकेचे सोमनाथ इथापे यांना बेस्ट आयटी हेड हा सहकार क्षेत्रातील मानाचा सन्मान मिळाल्याबद्दल त्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमास बुलडाणेकरांची भरगच्च उपस्थित लाभली.