माजी सैनिकाच्या स्मृतीदिनी स्मशान भूमीसाठी बाकडे (बेंच) दान व रक्तदान शिबीर संपन्न
बुलढाणा :-आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- कोलवड गावातील माजी सैनिक अर्जुन पुंजाजी जाधव यांच्या तृतीय स्मृतीशेष दिनी त्यांच्या कुटुंबाने कोलवड स्मशान- भूमी येथे वृद्ध व्यक्तींना बसण्यासाठी बाकडे ( बेंच) देऊन एक आदर्श निर्माण केला. त्यांच्या हया उपक्रमाचे कार्यक्रमास उपस्थित सर्वांनी कौतूक केले. बुलडाणा शहरापासून जवळ असलेले कोलवड गाव.
पंचक्रोशीतील अनेक गावांपैकी सैन्यदलात सर्वाधिक आजी व माजी सैनिकांची संख्या असलेले गाव म्हणून कोलवड गावाचा नावलौकीक आहे. आजी आणि माजी सैनिकांची खुप मोठी संख्या गावात आहे. याच गावातील सैन्यदलात जवळपास 21 वर्षे सेवा बजावलेले अर्जुन पुंजाजी जाधव यांचा 22 ऑक्टोबर 2020 रोजी वयाच्या 85 व्या वर्षी निधन झाले. सैन्य दलात कार्यरत असतांना 1962 साली चीन सोबत, 1965 व 1971 साली पाकीस्तान सोबत प्रत्यक्ष लढाईत भाग घेतला. त्यांच्या सैन्यदलातील गोष्टी ऐकतांना अंगावर शहारे येत असत. त्यांचा दि. 22 ऑक्टोबरला तिसरा स्मृती दिन. ह्या स्मृतीदिनी समाजासाठी काहीतरी उपयोगी उपक्रम राबवावा असा विचार त्यांच्या कुटुंबीयांच्या मनात आला. त्यावेळी माजी सैनिकांच्या पत्नी मा. ग्रा. पं. सदस्या आयु. वच्छलाबाई जाधव यांनी गावातील माझ्या सारख्या वृद्ध व्यक्तिंना अंत्यसंस्काराचे वेळी स्मशानभूमी मध्ये बसण्याचा त्रास होतो. तेव्हा बसण्यासाठी काहीतरी व्यवस्था करा असे सांगितले. त्यावर अर्जुन जाधव यांचे मोठे चिरंजीव जे स्वतः माजी सैनिक आहेत ते रमेश जाधव, सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत असलेले धाकटे चिरंजीव अभियंता राजेश जाधव तसेच कन्या आयु. संध्या नवगिरे तसेच आयु. रत्ना खरे यांनी सदर विचारास दुजोरा देऊन वडिलांचे स्मृती दिनी स्मशान भूमीत बाकडे (बेंच) देण्याचा मानस केला. व त्यानुसार स्मशान भूमी कोलवड येथे कार्यक्रम आयोजित केला. सदर कार्यक्रमास गावातील प्रतिष्ठीत से. नि. उपविभागीय अभियंता बी.टी. जाधव, माजी सरपंच सुभाषराव पाटील, माजी सरपंच कौतिकराव पाटील, राजे छत्रपती पतसंस्थेच्या अध्यक्षा सुनिताताई पाटील, सरपंच मीराताई पवार, ग्रामविकास अधिकारी श्री. पायघन, ग्रा.पं.सदस्य बबनराव पाटील, ग्रा.पं. सदस्य बाळू पाटील, ग्रा.पं. सदस्या संगीताताई जाधव, निवांत हॉटेलचे मालक संतोषराव पाटील, प्रा. मुरलीधर जाधव, सा. बुलडाणा संघर्षचे संपादक प्रा. सुभाष लहाने, आदर्श शिक्षीका खोब्रागडे मॅडम, सैनिक शाळेचे शिक्षक भगत सर, एडेड शाळेचे हिवाळे सर, पुरुषोत्तम गवई L.I.C, जाधव पेट्रोलियमचे अरुण जाधव, रत्नप्रभा सिमेंट हाऊसचे राजीव काकडे, संदीप जाधव (फौजी), माजी सैनिक पत्नी आयु. वच्छलाबाई जाधव, विजयाताई जाधव, किरण नवगिरे, प्रकाश खरे, सुरेखाताई गवई, वैभव जाधव, निखील गवई, अकिल गवई, प्रकाश गवई, प्रकाश गायकवाड, गजानन जाधव हतेडीकर, रत्नपाल गवई, समाधान पाटील इत्यादी हजर होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतीय बौध्द महासभेचे निरंजन जाधव यांनी धार्मिक विधी पार पाडला. त्यानंतर “बिना परिश्रम यश कहा” सैनिक संघटना बुलडाणा, या संघटनेतील माजी सैनिकांनी कालकधीत अर्जुन जाधव यांना ड्रेस कोडवर मानवंदना दिली. मेजर प्रकाश मिसाळकर ह्यांनी मानवंदनेचे नेतृत्व केले. त्यानंतर कालकथीत अर्जुन जाधव यांच्या स्मृती प्रित्यर्थ रक्त दानाचा कार्यक्रम आयोजीत केला होता. त्याचे उद्घाटन अभि. बी. टी. जाधव आणि सरपंच मीराताई पवार यांनी केले. रक्तसंकलनासाठी शासकीय रुग्णालय अकोला येथील चमु आली. व बिना परिश्रम यश कहा संघटनेच्या सैनिकांनी रक्तदान केले. या प्रसंगी, मेजर लक्ष्मण साळवे, मेजर कैलास खिल्लारे, मेजर राहुल जाधव, मेजर राजु वानखेडे, मेजर पंडीत जाधव, मेजर श्रीकृष्ण तायडे, मेजर महेन्द्र सरकटे, मेजर जितेन्द्र जाधव, मेजर गणेश जाधव, मेजर रमेश जाधव, स्वप्निल खरे, संदीप नरवडे, गणेश नरवडे आदींनी रक्तदान केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयु. दादाराव जाधव सर यांनी तर आभार प्रदर्शन आयु· इंजि. राजतनया जाधव यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत कार्यालय कोलवड, बिना परिश्रम यश कहाँ सैनिक संघटनेचे पदाधिकारी यांनी तसेच अंबादास पाटील, अशोकराव पाटील, भगवानराव पाटील, संदीप जाधव फौजी, वैभव जाधव, प्रकाश गायकवाड, प्रकाश गवई, अकिल गवई, गजानन जाधव, रत्नपाल गवई आदींनी परिश्रम घेतले.