Homeबुलढाणा (घाटावर)बुलढाणा घाटाखाली

बुलढाणा पोलिसांच्‍या मदतीला इस्राईल पद्धतीचे बुलेटप्रुफ कॅमेरे…

असंख्य कामाचा रूपये ७.५० कोटी किमतीचा भव्‍य भूमिपूजन सोहळा...

Spread the love

आपलं  बुलढाणा जिल्‍हा बातमी- बुलढाणा शहरांत इस्राईल पद्धतीचे बुलेटप्रूफ कॅमेरे बसविणे, शिक्षक भवन, ग्रामसेवक भवन, मनोरंजन केंद्र वृद्धाश्रम व तेजज्ञान फाउंडेशनसह ईतर असंख्य कामाचा रुपये ७.५० कोटी किमतीचा भव्य भूमिपूजन सोहळा बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
आपल्या विभागातील ज्येष्ठ नागरिक व वृद्ध नागरिक ज्यांना त्यांची मुलं वागवत नाही अशा नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांचे हक्काचे नैसर्गिक जीवन प्राप्तीसाठी आणि निसर्गाच्या सानिध्यात आपल्यापणाची भावना, जिव्हाळा, प्रेम, माया व सुखाच्या ओलाव्यात एकत्रित राहण्यासाठी या जगात रक्ताची नाती बेईमान झाली असली तरी आपले कोणी आहे ही जाणीव होण्यासाठी व आपले उरलेले आयुष्य आनंदाने व समाधानी जगता यावे याकरिता मनोरंजन केंद्र वृद्धाश्रम बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांच्या संकल्पनेतून एक स्वप्न आगळ्यावेगळ्या समाजाचे जिथे आयुष्य ओस वाहणार नाही,त्या ज्येष्ठ नागरिकांचा पुढील प्रवास आनंददायी होण्यासाठी तसेच अनाथ आई वडील, निराधार, बेघर, वंचित, सुचित,उपेक्षित वृद्ध व्यक्तीला मायेची उब व जगण्याची नवी दिशा असे आयुष्य मिळण्याकरता मनोरंजन केंद्र,वृद्धाश्रम व तेजज्ञान फाउंडेशनचा भव्य भूमीपुजन सोहळा आज रोजी पार पडला.
आमदार संजय गायकवाड यांनी बुलढाणा शहरांमध्ये मनोरंजन केंद्र वृद्धाश्रम,ओपन जिम जॉगिंग ट्रॅक ध्यान केंद्र खेळण्यासाठी मैदान, महावीर नगरमध्ये छत्रपती संभाजी महाराज सभागृह या सर्व कामांसह ईतर असंख्य कामांचा रुपये ७.५० कोटी रुपयाचे भूमिपूजन बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

यावेळी त्याठिकाणी व्यासपीठावर बुलढाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्यामजी चांडक साहेब,युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड,जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने,नगरपालिकेचे मुख्य अधिकारी श्री गणेश पांडे,शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, किसानसेना जिल्हाप्रमुख संदीप गायकवाड, वाहतूकसेना जिल्हाप्रमुख राजेश मुंगळे, अल्पसंख्यांक सेना जिल्हाप्रमुख कदीर भाई, मा. नगराध्यक्ष श्री विठ्ठलराव येवले, शिवसेना तालुकाप्रमुख धनंजय बारोटे, महिला आघाडी तालुकाप्रमुख वर्षाताई तायडे,शिवदूत तालुकाप्रमुख नितीन राजपूत,शिवसेना शहर प्रमुख गजेंद्र दांदडे, प्रवीण निमकर्डे,युवासेना शहरप्रमुख श्रीकांत गायकवाड,नपा माजी आरोग्य सभापती आशिष जाधव शिवसेना कार्याध्यक्ष आकाश दळवी, शिवसेना उपशहरप्रमुख गोटू येरमुले, सुनील भाग्यवंत,मुन्नाजी बेंडवाल,शाम पवार, शब्बीर कुरेशी,शेख. गुलाबबाबा,श्री शामराव घट्टे, शिवसेना महिला आघाडी शहरप्रमुख वैशालीताई ठाकरे, युवतीसेना शहर प्रमुख रामेश्वरीताई चव्हाण,शिवसेनेचे उपतालुका प्रमुख अनिल जगताप,राजेशजी देशलहरा, घनश्याम चोपडा,मधुकर पऱ्हाड,रवी वाघ,नितीन सुपे, विजय काळवाघे, निलेश पाटील, देवानंद दांडगे,संजय तोटे,श्री बरडे, कुलकर्णी,गजानन मुट्ठे,नगरसेवक श्री विजय जायभाये, दीपक सोनुने, अरविंद होंडे बाळासाहेब धूड,मोहन पऱ्हाड,उमेश कापुरे, रामेश्वर वावरे, पुरुषोत्तम हेलगे, गोविंदा खुमकर,रमेश गायकवाड, उदयदादा देशपांडे,मंदार बाहेकर,याकुब शेख, वैभव इंगळे, कैलास माळी, मनोज यादव, रमेश परसे,स्वीय सहाय्यक श्रीकृष्णा शिंदे, संतोष शिंगणे,अनुप श्रीवास्तव,गोटु शर्मा, उमेश शर्मा, ओम शर्मा,दीपक तुपकर,ज्ञानेश्वर खांडवे,विजय दुरणे,सचिन कोठाळे, विजय ईल्लरकर, राजेश चव्हाण,यांच्यासह प्राथमिक शिक्षक संघटना, ग्रामसेवक संघटना, हॅपी थॉट्सचे सर्व सन्मानीय सदस्य,जिल्हा पोलीस दलाचे सर्व कर्मचारी, जेष्ठ नागरिक तसेच शिवसेना युवा सेनेचे पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते…!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page