Homeक्राईम डायरीबुलढाणा (घाटावर)बुलढाणा घाटाखाली

शिक्षकचं निघाला भक्षक १३ वर्षीय विद्यार्थीनीवर केला त्‍या नराधमाने लैगिंक अत्‍याचार..

 बुलढाणाच्या जवळ बालाजी मंदिरानजीक वाहनात केले पाप, शेवटी बुलढाणा शहर पोलिसांनी ठोकल्या त्‍याला बेड्या

Spread the love

बुलढाणा (आपलं बुलढाणा जिल्‍हा बातमी): मोताळा तालुक्यातील एका गावातील विद्यार्थिनी गावात मध्ये शिक्षणाची सोय उपलब्ध नसल्यामुळे बुलढाणा येथे शिक्षण घेण्यासाठी एका वस्तीगृहात राहत होती. सविस्तर वृत्त अशे की,एका १३ वर्षीय विद्यार्थीनिवर अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. मलकापूर मार्गावरील बालाजी मंदिर परिसरात एका वाहनात हे कृत्य केले. सततच्या अत्याचाराने त्रस्त १३ वर्षीय पीडितेने अखेर जिल्हा परिषद शिक्षकांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. बुलढाणा शहर पोलिसांनी शिक्षकाला अटक केली असून आरोपीची बोलेरो गाडी सुद्धा जप्त करण्यात आली आहे.
जिल्ह्याच्या शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. सतीश विक्रम मोरे वय वर्ष ४१ असुन तो मोताळा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या एका शाळेत शिक्षक आहे.विद्यार्थिनी गेल्या वर्षीपर्यंत तो ज्या शाळेत शिक्षक आहे त्याच शाळेत शिकत घेत होती. गावात पुढील शिक्षणाची सोय नसल्याने सध्या विद्यार्थिनी बुलढाणा शहरातील एका वस्तीगृहात राहून एका शाळेत शिक्षण घेत आहे.सकाळी ११ च्या सुमारास सतीश मोरे हा बोलेरो कार घेऊन त्याच रस्त्याने आला. मुलीला थांबवून तिची विचारपूस केली व तुला शाळेत सोडतो म्हणत गाडीत बसवलं. नंतर मात्र गाडी शाळेजवळ जाऊनही शिक्षकाने गाडी थांबवली नाही. तुझे शाळेतल्या कार्यक्रमादरम्यान कपडे बदलतांनाचे फोटो माझ्याजवळ आहेत, ते तुला दाखवायचे आहे असे म्हणत सतीश मोरे याने चारचाकी वाहन बालाजी मंदिराच्या प्रवेशद्वारजवळ नेली. तिथे उभी केल्यावर सतीश मोरे मागच्या सीटवर येऊन बसला. त्याने बदनामीची धमकी देत अत्याचार केला. नंतर वस्तीगृहाजवळ आणून सोडत, घडलेला प्रकार कुणाला सांगितला तर कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी दिली.
पुन्हा ४ ते ५ दिवसांनी सुरेश मोरे याने मुलीला तिच्या शिकवणी वर्गाजवळ गाठले. पुन्हा धमकावत एका ठिकाणी नेऊन अत्याचार केला, असा प्रकार तीनदा घडल्याचे तक्रारीत नमूद आहे. यामुळे तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. बुलढाणा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रल्हाद काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश लोधी हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page