चिखली तालुक्यातील भरोसा या गावांमध्ये मायलेकांची आत्महत्या
तर वाचवण्यासाठी गेलेल्या युवकाचाही गाळात फसून मृत्यू …
चिखली (आपलं बुलढाणा जिल्हा बातमी) – सहा नोव्हेंबर ची रात्र काळरात्र बनून आली २५ ते २६ वर्षे महिने अवघ्या २० महिन्याच्या चिमुकल्यासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना भरोसा या गावांमध्ये घडली. विहिरीत उडी मारणाऱ्या मायलेकांना वाचवण्यासाठी भरोसा गावातील एका तरुणाने विहिरीत मध्ये उडी घेतली मात्र त्या विहिरीत मध्ये गाळ असल्यामुळे त्या तरुणाचा सुद्धा त्यामध्येच मृत्यू झाला त्यामुळे आज भरोसा गावावर हळहळ व्यक्त होत आहे. सविस्तर वृत्त अशे की.
भरोसा येथील विवाहिता शितल गणेश थुट्टे हिने अवघ्या २० महिन्यांचा देवांश या चिमुकल्यासह गावातील शेतकरी दिनकर जाधव यांच्या मालकीच्या विहिरीत ६ नोव्हेंबरच्या सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास उडी घेऊन आत्महत्या केली. शितल हिने चिमुकल्यासह विहिरीत उडी घेतल्याचे समजताच त्यांच्या वाचविण्यासाठी गावातील सिध्दार्थ निंबाजी शिरसाठ यांनी विहिरीत उडी घेतली. मात्र, सिध्दार्थ यांचे पाय गाळात फसल्याने त्यांचाही करूण अंत झाला.
सिद्धार्थ शिरसाट हे पट्टीचे पोहणारे होते. परंतू, संध्याकाळची वेळ असल्याने विहिरीत अंधार होता. शिवाय विहिरीतील गाळ असेल याची त्यांना कल्पना नसल्याने त्यांचाही घात झाला. दरम्यान गावातीलच सुखदेव त्र्यंबक थुट्टे यांनी विहिरीत उडी घेतली होती. सुदैवाने काठावरील ग्रामस्थांनी तातडीने विहिरीत दोर सोडून त्यांना सुखरूप बाहेर काढले. माहिती मिळताच अंढेरा पोलिस निरीक्षक विकास पाटील यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. रात्रीचा अंधार व विहिरीत गाळ असल्याने मृतदेह काढणे जिकरीचे ठरले होते. ७ नोव्हेंबरच्या पहाटे हे तीनही मृतदेह बाहेर काढल्यानंतर तिघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी चिखली ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आले होते. दुपारी भरोसा येथेही तीनही मृतदेहांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.