बुलढाणा विधानसभा मतदारसंघात मनसेची मोर्चेबांधणी…
बुथ कमिट्या गठित करण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी कामाला लागावे – अमोल रिंढे पाटील
बुलढाणा – आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- पक्षाची विचारसरणी तळागळात पोहोचवण्यासाठी बुथ कमिट्या सक्षम असणे अत्यावश्यक आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बुथ कमिट्या गठित करण्यासाठी कंबर कसली असून आगामी दोन महिन्यात बुलढाणा विधानसभा मतदारसंघात बुथ तिथे कमिटी असेल असा आशावाद मनसे तालुकाध्यक्ष अमोल रिंढे पाटील यांनी व्यक्त केला आहे.
आगामी स्थानिक स्वराजसंस्थांच्या तसेच लोकसभा विधानसभा निवडणूकांच्या अनुषंगाने राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीस सुरवात केली आहे. त्यात आता मनसेच्या वतीनेही बुलढाणा विधानसभा मतदारसंघात पक्षसंघटनेच्या व्यापक चळवळीस सुरवात झाली आहे. १७ नोव्हेंबरपासून अमोल रिंढे यांचा बुलढाणा विधानसभा संपर्क दौरा सुरु होत असल्याचे त्यांनी सांगितले. मनसेच्या शाखा प्रमुख, सर्कल प्रमुख , मनसे विद्यार्थी सेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी बुथ तिथे कमिटी स्थापन करावी असे आवाहन मनसे तालुकाध्यक्ष अमोल रिंढे पाटील यांनी केले आहे.