श्री सदगुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने अंध. अपंग. मूकबधिर. गरजूंना कपडे. फराळ. मिठाई देवुन दिवाळी साजरी
मुख मे हो राम नाम. राम सेवा हाथ मे --देविदास शर्मा
खामगाव- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- दिपावली मध्ये घरोघरी उत्साहाचे वातावरण असते प्रत्येक कुटुंब आप आपल्या परीने दिवाळी चा आनंद साजरा करतात गोडगोड पदार्थ दिव्यांची आरास. नवीन कपडे.नव्या वस्तुंची खरेदी.असा सगळी कडे असतो परंतु गोर गरीबांना या पासून वंचित रहावे लागते अशा गोरगरीबाचा सहारा व रस्त्यावर रहाणाऱ्या लोकांच्या ही जिवनात दिवाळी चा आनंद फुलावा या भावनेतून वंचित घटका सोबत दिवाळी चा आनंद साजरा करावा असा विचार करणारे काही थोडे लोक असतात गरीबांची जान असणारे स्थानिक सतिफैल भागातील देविदास ऊर्फ मुन्नाभाऊ शर्मा यांनी सन २००० मध्ये ह- भ- प गोपाल महाराज रेवस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सदगुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाची स्थापना केली व मागिल २३ वर्षा पासून मंडळाच्या माध्यमातून विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम निस्वार्थ पणे मुख मे हो राम नाम राम सेवा हाथ मे हे ध्येय घेऊन ज्या लोकांच्या डोक्यावर छत नाही अंगावर पुरेसे कपडे नाही खायला दोन वेळ चे अन्नधान्य नाही अशा समाजातील उपेक्षित लोका प्रति आपले ही काही देन लागते हा उद्देश समोर ठेऊन अखंड पणे उपक्रम राबत आहे आज दिं १४-११-२०२३ मंगळवार बलिप्रतिपदा व दिपावली पाडवा चे औचित्य साधुन शहरातील विविध ठिकाणी जाऊन अंध.अपंग.गोरगरीबांना फराळ. कपडे.महीलांना साडी. मिठाई वाटप करून दिवाळी साजरी करण्यात आली .
या प्रसंगी जेष्ठ शांताराम भाऊ गुळवे. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देविदास शर्मा. विनोद भाऊ सुकाळे. दिलीप भाऊ झापर्डे.प्रमोदभाऊ गायकवाड. विक्की देशमुख. लालाजी सांगळे.गोपाल लाड. दादा ठाकुर. शकुंतला बाई ढवळे. इंदुबाई गायकवाड. सुशिला बाई आवलकर.जयाबाई सुकाळे. आशाबाई अंधारे. मंगला बाई बावस्कर. संगीताबाई वाकोडे.वर्षाबाई देशमुख. पार्वतीबाई सुकाळे. जयश्री ताई झापर्डे.उज्वल सुकाळे.पुजा लाड. पिल्ले बाई. शोभाताई. लक्ष्मीबाई.भजनी मंडळ चे सर्व सदस्य हजर होते
अशी माहिती श्री सदगुरु एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने देण्यात आली