Homeबुलढाणा (घाटावर)बुलढाणा घाटाखाली

बहिणीने आपल्या भावाला यकृत दान करून भाऊबिजेची दिलीआगळीवेगळी भेट…

बहिण भावाच्या प्रेमाची सर्वत्र चर्चा

Spread the love

चिखली:- आपलं बुलढाणा जिल्‍हा बातमी- आज डिजिटल युगामध्ये फक्त स्टेटस, डीपी यासारखे मोबाईलमधील विविध असलेले साधना वापरून आपण आपल्या मित्र नातेवाईक व जगाशी संपर्कात असतो. त्यात आपण काय केले काय नाही हे याच माध्यमातून आपल्याला कळत असते. त्यामध्ये आपले सुखदुःख देखील समाविष्ट असतात. पण एका बहिणीने कृतीतून आपल्या भावाला नव जीवदान दिले असे म्हटले तर वाव ठरणार नाही. अनेक चित्रपटांमध्ये जे दृश्य आपण पारिवारिक रूपात दाखवल्या जातात त्याला प्रत्यक्ष आपल्या कृतीतून बुलढाणा जिल्‍ह्यातील बहिणीने जगासमोर आणले आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील अंढेरा येथील रमेश नागरे (वय वर्ष ४८) हे मूळ शेतीसह हॉटेल व्यवसाय करतात. २०१९ पासून त्यांना पोटाचा विकार सुरू झाला. प्राथमिक स्वरूपात त्यांना देऊळगाव राजा, जालना, छत्रपती संभाजीनगर येथे दाखविण्यात आले. मूळ कारण लक्षात येत नसल्याने अखेरीस त्यांना स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये तपासण्यात आले.लिव्हरमध्ये अडचण असल्याचे निदान झाल्यानंतर लिव्हरचा काही भाग त्यांना मिळणे आणि त्याचे ट्रान्सप्लांट होणे गरजेचे असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानुसार त्यांना आवश्यक असलेले लिव्हर घटक कोण देणार यात कुटुंब, नातेवाइकांत चर्चा झाली. लिव्हर देणाऱ्या व्यक्तीचे आणि रमेश नागरे यांचा रक्तगट व अन्य काही सम असणे आवश्यक होते. अनेकांचा रक्तगट तपासण्यात आला त्यात बहीण दुर्गाताई धायतडक यांचा रक्तगट रमेश यांच्याशी मॅच झाला.

दुर्गाताई या रमेश यांच्या धाकट्या बहीण आहेत. पळसखेड चक्का येथील धायातडक कुटुंबातील आदर्श सून, आपल्या कुटुंब, परिवारावर प्रेम करणारी गृहिणी… या आधुनिक दुर्गाताईने कोणताही विचार न करता आपल्या थोरल्या भावला जीवनदान देण्याचे ठरविले. डॉक्टरांनी दुर्गा यांच्या सर्व आवश्यक तपासण्या केल्या आणि लिव्हर ट्रान्सप्लांट करण्याचे निश्चित झाले.मुंबई येथील एका नामांकित खासगी रुग्णालयात दोन दिवसांपूर्वी हे ट्रान्सप्लांट झाले. भाऊ, बहीण दोघेही सुखरूप आहेत. येत्या काही दिवसांत दुर्गा यांना हॉस्पिटलमधून सुटी देण्यात येणार आहे, तर रमेश यांना दोन महिने पुढील उपचार घ्यावे लागणार आहेत. प्रकाशपर्व मानल्या जाणाऱ्या या दिवाळीसणात बहिणीने आपल्या थोरल्या भावाचे जीवन प्रकाशमान केले. भावा-बहिणीच्या नात्यातील या निस्सीम प्रेमाची चर्चा परिसरात होत आहे.पळसखेड चक्का येथील बहिणीने आपल्या भावाला यकृत दान करून भाऊबिजेची आगळीवेगळी भेट दिली,असे म्हणाला हरकत नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page