आयशर ट्रकच्या चाकात येउन १० वर्षीय बालकाचा बळी…
जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण वाढले
बुलढाणा- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी – बुलढाणा शहरातील इकबाल चौकात आयशर ट्रकच्या पाठीमागच्या
चाकाखाली येउन १० वर्षीय बालकाचा मृत्यू झाला आहे. हि घटना आज दि १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७-३० वाजेच्या सुमारास घडली आहे.
स्मशानभूमीकडे जात असलेल्या एम.एच २८ बी.बी.७१७१ क्रमाकांच्या आयशर ट्रकच्या मागच्या चाकात सायकल खेळणारा मुलगा अडकला. व जागेवरच त्याचा दुदैवी मृत्यू झाला आहे. गणेश विजय घुडे वय १० वर्षीय रा. जौहर नगर स्मशानभूमीजवळ असे अपघातात मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. या अपघातानंतर इकबाल चौकात मोठ्या प्रमणात गर्दी जमा झाली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तणावावर नियंत्रण मिळविले.आयशर ट्रकचा ड्रायव्हर शेख इबाराइम शेख रेहमान असे त्याचे नाव असून
त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. व ट्रकला बुलढाणा शहर पोलिस स्टेशनला जमा करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जनता चौक ते स्मशानभूमीपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झालेले असल्यामुळे दिवसातून कित्येक वेळा या ठिकाणी ट्रॅफिक जाम होते. वाहनांच्या या गर्दीमुळे अनेकदा अपघाताची स्थिती निर्माण होते. आज झालेला अपघात अतिक्रमणाचाच परिणाम असून या अतिक्रमणामुळे मुलाचा बळी गेला असल्याची चर्चा जनता चौकात ऐकायला मिळाली.
आईवडील त्याच ठिकाणी हॉटेलवर कामाला होते.अत्यंत गरिब परिस्थिती त्यांची आहे.
जिल्ह्यात मागील आठ दिवसांमध्ये रस्ते अपघाताचे प्रमाण वाढले आहे.एकीकडे जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर अपघाताच्या घटना कमी होत नसताना आता जिल्ह्यातील महामार्गावर देखील खाजगी बसने एका दुचाकीला चिरडले आहे. भर दिवाळीत हा अपघात घडला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा रस्ते अपघात आणि त्यावरील दुचाकी अपघाताचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भरधाव खासगी बसने राष्ट्रीय महामार्गावर वडनेर भोलजी नजीक पुलाजवळ दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील तिघांचा मृत्यू झाल्याची घटना १५ नोव्हेंबरच्या मध्यरात्री घडली. पंधरा दिवसांची दिवाळीची सुटी असल्याने ते शेगाव येथे दर्शनासाठी गेले असता त्यांचा अपघात झाला.राष्ट्रीय महामार्गावर वडनेर गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावर वडनेरजवळ खासगी बसने क्रमांकाच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील वराड येथील गोपाल शालिक राणे (३४) वर्षे जळगाव शहरातील गिरणा कॉलनी येथील स्वप्निल भैया करणकार (२४) यांचा घटनास्थळावर मृत्यू झाला. कल्याण येथील रहिवासी आकाश राजू आखाडे (३०) यांचा मलकापूर येथे रूग्णालयात घेवून जाताना मृत्यू झाला. दोघांचे प्राथमिक आरोग्य केंद्र नांदुरा येथे तर तर तिसऱ्याचे मलकापूर येथे शवविच्छेदन करण्यात आले.याबाबत नांदुरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश जायले, ओम साई फाउंडेशन नांदुराचे अध्यक्ष विलास निंबोळकर, कृष्णा नालट, आश्विन फेरण, राजू बगाडे रुग्णवाहिकासह घटनास्थळी पोहचले. त्यांनी अपघातातील मृतांना प्राथमिक आरोग्य केंद्र नांदुरा येथे आणले. स्वप्नील करणकार याचा दीड वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्याला एक सहा महिन्याची मुलगी आहे. तिघेही एकाच कंपनीत कामाला होते.