बुलढाणा विधानसभा क्षेत्रातील शिवसेना बूथ प्रमुख व शिवदूत यांना शुभेच्छापत्र व भेटवस्तू वाटप कार्यक्रम संपन्न
बुलढाणा – आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील तसेच मोताळा तालुक्यातील सर्व शिवसेना बूथप्रमुख व शिवदुत यांना महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी व फलसंवर्धन मंत्री ना. संदीपानजी भुमरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांचे शुभहस्ते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शुभेच्छापत्र व भेटवस्तूचे वाटप करण्यात आले.
यावेळी त्या ठिकाणी व्यासपीठावर युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड,धर्मवीर युथ फाऊंडेशन अध्यक्ष पृथ्वीराज संजय गायकवाड,शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत,शिवसेना उपजिल्हाप्रमुख भोजराज पाटील,शिवसेना नेते बाळासाहेब नारखेडे,शरदचंद्र पाटील,किसान सेना जिल्हाप्रमुख संदीप गायकवाड,युवासेना उपजिल्हाप्रमुख प्रवीण निमकर्डे,शिवसेना तालुकाप्रमुख धनंजय बारोटे, रामदास चौथनकर, शिवदुत तालुकाप्रमुख नितीन राजपूत,युवासेना तालुकाप्रमुख श्रीकांत जाधव,विश्वंभर लांजुळकर, मोताळा शिवसेना महिला आघाडी तालुकाप्रमुख अंजनाताई खुपराव,स्वातीताई देशमुख,शिवसेना शहरप्रमुख गजेंद्र दांदडे, युवासेना शहरप्रमुख श्रीकांत गायकवाड,मोताळा युवासेना शहरप्रमुख सचिन हिरोळे, शिवसेना महिला आघाडी शहर संघटक वैशाली ठाकरे,युवतीसेना संघटक रामेश्वर चव्हाण, माजी नगराध्यक्ष विठ्ठलराव येवले,मा. आरोग्य सभापती न.पा आशिष जाधव यांच्यासह बुलढाणा तसेच मोताळा तालुक्यातील सर्व शिवसेना, युवासेना, किसानसेना, अल्पसंख्यांक सेना, महिला आघाडीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, बुलढाणा, मोताळा येथील सर्व नगरसेवक,शिवसैनिक उपस्थित तथा शिवदूत, बुथकमिटी प्रमुख उपस्थित होते.