बांधकाम मजुराचा मुलगा DRDO मध्ये झाला शास्त्रज्ञ!
लोणार (राहुल सरदार)- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- लोणार तालुक्यातील गोत्रा गावामधील अमोल सखाराम आंधळे ह्याची नुकतीच DRDO मधे ज्यु. साइंटिस्ट म्हणून निवड झाली आहे. जुलै २०२३ मधे डिपार्टमेण्टल परीक्षेत त्याला यश मिळाले आणि नंतर त्याला DRDO बेंगलोर साठी निवडण्यात आले.
ह्याआधी, अमोल HAL नाशिक येथे इंटर्नशिप केल्यानंतर, अकाऊंट असिस्टंट म्हणून कार्यरत होता. तेथेच उच्चश्रेणीची परीक्षा दिली आणि उच्चस्थान मिळवले आहे. जवळपास महाराष्ट्रातून फक्त दोनच उमेदवार निवडण्यात आले होते, त्यापैकीच एक होय.
अमोलने आतापर्यंत अपयशचं पचवले आहे, २०१५ च्या पोलीस भरतीमधे मेडिकल अनफिट मुळे अपयश आले, नंतर २०१६ मधे आर्मी मधे त्याच कारणामुळे अपयश आले, पुढे पुणे येथे इंजीनियरिंग ला असताना भारतीय नौदलामधे पूर्णयश न मिळताच अपयश पत्करावे लागले. तरीही कधी हार मानली नाही आणि सप्टेंबर २०१९ मधे इंडोजर्मन ह्या कंपनीमध्ये हजारो उमेदवारांमधून निवड झाली आणि कार्याला सुरवात करण्याआधीच लॉकडाउन लागले व सर्वकही सोडून गावी परत यावे लागले.
अमोल दोन वेळा पदवीधर तर एक वेळ पदवित्तर आहे, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, अमरावती विद्यापीठ, दिल्ली विद्यापीठ आणि पुणे विद्यापीठ मधून शिकलेला आहे. सध्या MBA HR करत आहे. अमोलच्या परिवारामध्ये आई-वडील, दोन भाऊ, वडील बांधकाम मजूर आहेत, मोठा भाऊ पुणे येथे अकाऊंटंट आहे, तर छोटा भाऊ अजून शिकत आहे आणि आई-वडील शेती करतात.