भारत राठोड यांची तेलंगणा राज्यातील बासवाडा विधानसभा प्रभारी म्हणून नियुक्ती
लोणार (राहुल सरदार)-आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- राजकारणातील काँग्रेस पक्षाचे खासदार तथा काँग्रेस पक्षाचे महासचिव मुकुलजी वासनिक तथा नानाभाऊ पटोले प्रदेश अध्यक्ष काँग्रेस पार्टी महाराष्ट्र यांच्या आदेशाने मार्गदर्शक संजयजी भाऊ राठोड काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष ,बुलढाणा जिल्ह्याचे काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राहुल भाऊ जी बोंद्रे, यांच्या आदेशाने तेलंगणा राज्याचे प्रभारी माणिकरावजी ठाकरे साहेब यांच्या आदेशाने काँग्रेस पक्षाचे कामकाज बघता व काँग्रेस पक्षासाठी केलेलं काम बघता भारत रामराव राठोड यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे ही एक आनंदाची बाब लोणार तालुक्यासाठी असून एक प्रभारी म्हणून तेलंगणा राज्य विधानसभा निवडणुकीसाठी बासवाडा विधानसभा2023साठी प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे… एकदम अशा कमी वयामध्ये राजकारणामध्ये ठसा उमटत व अनेक पदभुसवत अशी चांगली प्रकारची कामगिरी भारत राठोड यांनी केलेली आहे आणि ते सतत पक्षाशी एकनिष्ठ असल्याकारणाने आज पक्षाची एवढी मोठी जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आलेली आहे नक्कीच तालुक्यासाठी आनंदाची बाब आहे