वैदू बहुरूपी यांच्या पालावर डॉ. बछिरे यांची भाऊबीज साजरी
लोणार (राहुल सरदार)-आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- लोणार येथील वैदू,बहुरूपी यांच्या झोपड्या (पालावर) महिला भगिनींनी डॉ.गोपाल बछिरे जिल्हा संघटक शिवसेना उबाठा यांना ओवाळून, औक्षण करून भाऊबीज साजरी करण्यात आली.
लोणार मेहकर रोडवर वैदू व बहुरूपी समाजाचे शेकडो पाल (झोपड्या) आहेत परंतु समाज त्यांची कोणत्याही प्रकारची दखल घेत नाही अनेक जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील वेगवेगळ्या ठिकाणचे लोक हे एकत्र येऊन त्यांनी लोणार, शारा परिसरात झोपडीची वस्ती वसवली आहे.
वैदू, बहुरूपी काबाडकष्ट करून आपले उदरनिर्वाह करतात विना विजेचे विना घराचे हे लोक झोपडी करून राहतात या वैदू बहुरूपींच्या झोपडी परिसरात भाऊबीज ओवळणीसाठी डॉ.गोपाल बछिरे यांना निमंत्रित केले होते. तेथील महिला भगिनींनी डॉ.बछिरे यंना ओवाळून त्यांचे औक्षण करण्यात आले, त्या महिला भगिनींना, एका भावाचे उत्तरदायित्व म्हणून साड्यांचे वाटप करून लहान बाल गोपलांना मिठाईचे वाटप करन्यात आले. वैदू ,बहुरूपी माता भगिनींसोबत भाऊबीज साजरी करून झोपडीत राहणारे हे सुद्धा आपलेच बहीण भाऊ आहेत आपल्या सुखा दुःखाचे क्षण त्यांच्यासोबतही व्यतीत करून एक आगळावेगळा संदेश समाजास देण्यात आला याप्रसंगी तालुका प्रमुख ऍड. दीपक मापारी, शहर प्रमुख गजानन जाधव सर, श्याम राऊत, तानाजी मापारी, गोपाल मापारी, लूकमान कुरेशी, एकबाल कुरेशी, सय्यद उमर, किशोर बछिरे, अनिल पसरटे, अजय बछिरे यांच्या सह मोठ्या संख्येने वैदू बहुरूपी बांधव उपस्थित होते.