लोणार येथील जैन धर्मियांच्या साठी खासदार प्रतापराव जाधव व आमदार डॉ संजय रायमूलकर यांच्या प्रयत्नाने २ कोटी ८५ लक्ष रुपयांचा निधी मंजूर
लोणार शहरातील विकास कामासाठी कोट्यावधी चा निधी मंजूर
लोणार (राहुल सरदार)-आपलं बुलढाणा जिल्हा बातमी-लोणार शहराचा चेहरा मोहरा बदलण्या साठी सद्या खासदार प्रतापराव जाधव आमदार डॉ संजय रायमूलकर यांनी सद्या भरभरून निधी मंजूर केला आहे त्या मध्ये जैन धर्मियांचा सात एकर संपूर्ण जागेसाठी संरक्षण भिंत तसेच मोठे सभागृह ज्या मध्ये एका वेळी ३००० लोक बसतील तसेच ४ खोल्या व शौचालय त्या मध्ये देण्यात येणार आहे त्या मध्ये सरदार वलभभाई पटेल हायस्कुल पर्यँत सिमेंट रस्ता सुद्धा होणार असल्याची माहिती शिवसेना जिल्हा प्रमुख तथा कृषिउत्पन बाजार समिती सभापती प्रा.बळीराम मापारी यांनी कृषिउत्पन बाजार समिती मधील आयोजित पत्रकार परिषद मध्ये दिली
या सोबतच लोणार शहरातील मेहकर रोडवर हिंदुहृद्य सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने प्रवेश द्वार करण्यात येणार आहे तसेच स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांच्या स्मृती ना उजाळा देण्यासाठी लोणी रोड वर त्यांच्या नावाने प्रवेश द्वार बनविण्यात येणार आहे त्या साठी ६० लक्ष ८० हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे तसेच मंठा रोडवर लोणार चे आराध्य दैवत माँ कमळजा यांच्या नावाने प्रवेशद्वार करण्यात येणार आहे तसेच शहरातील विविध चौकाच्या सोंदरीकरणा साठी १ कोटी ५१ लक्ष रुपयांचा निधी न
मंजूर करण्यात आला आहे असा एकूण ४ कोटी ९६ लक्ष ९७ हजार रुपयांचा भरघोस निधी खासदार प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनात आमदार डॉ संजय रायमूलकर यांच्या पुढाकारातून मंजूर झाला असल्याची माहिती शिवसेना जिल्हा प्रमुख तथा बाजार समिती सभापती प्रा.बळीराम मापारी यांनी दिली
स्थानिक जैन धर्मियांच्या साठी ३००० लोक बसतील एव्हडा मोठा सभागृह डोम तसेच संरक्षण भिंत व ४ खोल्या शौचालय व स्नान गुहा सह होणार असल्याने सामाजिक कार्यक्रमाच्या साठी मोठा आधार होणार आहे खासदार प्रतापराव जाधव व आमदार डॉ संजय रायमूलकर यांच्या प्रयत्नाने जैन बांधवांच्या साठी एव्हड्या मोठ्या प्रमाणात निधी मंजूर झाल्याने या मध्ये सर्व समाज बांधवांनी पुढाकार घेऊन विकास कामे करून घ्यावे व या मध्ये कोणतेही पक्षीय राजकारण न आणता समाजच्या हिताचे विचार करून समाजाचा विकास करावा असे आवाहन शिवसेना जिल्हा प्रमुख तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती प्रा. बळीराम मापारी यांनी यावेळी केले.