आमदार संजय गायकवाड यांचा अपघातामध्ये मृत्यु पावलेल्या चिमुकल्याच्या कुटुंबाला मदतीचा हात
बुलढाणा- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- बुलढाणा शहरातील इकबाल चौकामध्ये ट्रकच्या मागील चाकामध्ये येऊन अपघात झाल्यामुळे जोहर नगर स्मशानभूमी जवळ राहणाऱ्या चिमुकल्या स्व. गणेश विजय घोडे वय वर्ष १० याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता, त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची असल्यामुळे त्यांना एक मदतीचा हात म्हणून माणुसकीच्या नात्याने बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संजय गायकवाड यांनी त्यांच्या कुटुंबाला ०३ महिन्यापर्यंत पुरेल असे (गहू,तांदूळ, तुरीची डाळ, हरभऱ्याची डाळ, उडीद डाळ, साबण, तेल,हळद, मसाले,मिरची पावडर) अशा संपूर्ण जीवनावश्यक किटसह त्या कुटुंबाचे प्रमुख श्री.विजय घोडे आणि शीतल घोडे यांना सुपूर्द केली,
यावेळी त्या ठिकाणी सोबत युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड, धर्मवीर युथ फाऊंडेशन अध्यक्ष पृथ्वीराज संजय गायकवाड,अमित ठाकरे, स्वीय सहाय्यक श्रीकृष्ण शिंदे,ज्ञानेश्वर वाघ,श्री जाधव सर, गोपाल भाग्यवंत, गजानन गायकवाड, रामभाऊ जाधव, सागर घट्टे, विकी आव्हाड, सचिन हिरोळे,सागर देशमुख,संतोष गावंडे,ज्ञानेश्वर खांडवे,अक्षय चिंचोले यांच्यासह शिवसेना युवासेनेचे पदाधिकारी तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.