सारशीव येथील विनापरवाना असलेली देशी दारू पोलिसांनी केली जप्त
मेहकर – आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- आरोपी चे राहते घरासमोर सारशीव ता. मेहकर याचे कब्जातून अपराध क्र.345/2023 कलम 65 नुसार विनापरवाना अवैधरित्या 4900 रुपयांची देशी दारू जप्त करण्याची कारवाई पोलिसांनी 20 नोव्हेंबर 2023 रोजी केली आहे.
प्रकरणाची हकीकत अशी की, फिर्यादी सफौ हुसेन कन्हैया पटेल, पो. स्टे. जानेफळ, आरोपी नारायण रामचंन्द्र ढोणे वय 56 वर्षे रा. सारशीव ता. मेहकर जि. बुलढाणा यांनी आरोपी चे राहते घरासमोर सारशीव ता. मेहकर येथे देशी दारू सखू संत्रा काचेच्या 180 मि. ली. च्या 40 शिश्या सिलबंद किंमती प्रत्येकी 70 रू. प्रमाणे 2800 रूपये, देशी दारू सखू संत्रा प्लॅस्टीकच्या 90 मि. ली. च्या 60 शिश्या सिलबंद किंमती प्रत्येकी 35 रू. प्रमाणे 2100 रूपये असा एकून 4900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
आरोपी याचेवर पंचसमक्ष पोलिस स्टापसह प्रोही रेड केला असता आरोपी याचे कब्जातून विनापरवाना अवैधरित्या देशी दारू सखू संत्रा काचेच्या 180 मिली 40 शिश्या कंम्पनी सिलबंद किंमती प्रत्येकी 70 रू. प्रमाणे 2800 रूपये, देशी दारू सखू संत्रा प्लॅस्टीकच्या 90 मि. ली. 60 शिश्या कंम्पनी सिलबंद किंमती प्रत्येकी 35 रू. प्रमाणे 2100 रूपये असा एकूण 4900 रुपयांचा मुद्देमाल विक्री करण्याचे उद्देशाने कब्जामध्ये बाळगतांना मिळून आला, अशी फिर्याद सोफो हुसेन कन्हैया पटेल पोलिस स्टेशन जानेफळ यांनी लेखी रिपोर्ट वरून सदर कारवाई केली. या प्रकरणी आरोपीकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला. प्रकरणाचा तपास ठाणेदार यांचे आदेशाने पोउपनी माधव पेटकर यांचे कडे देण्यात आला. आरोपी यास जागेवर सूचनापत्र देवून सोडण्यात आले. हे कारवाई पी. एस. ओ. यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. माधव पेटकर, हुसेन पटेल, पोका दीपक पाटील, चालक पोका माधव काणे, यांच्यासह सदाशिव गावान, प्रोव्ही रेड केला असता आरोपीकडून देशी दारू चा 4 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यावेळी तपास उपनि माधव पेटकर करीत आहे.