निसर्गांनेही साथ सोडली कसेतरी पाण्याचा मेळ लावुन पेरला हरभरा मात्र उगवली सोयाबीन
बुलढाणा – आपलं बुलढाणा जिल्हा बातमी :- सोयाबीनची सोंगणी करताना उन्हाचा पारा वाढला होता त्यामुळे शेंगा फुटल्या. या शेतात शेतकऱ्यांनी हरभऱ्याची पेरणी केली. मात्र, पाणी दिल्यानंतर, हरभरा कमी तर सोयाबीनच जास्त प्रमाणात उगवल्याने शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे.
दरवर्षीच्या तुलनेत यंदा अत्यल्प प्रमाणात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना सोयाबीनसह इतर पिकांच्या उत्पादनात मोठा फटका बसलेला पहायला मिळाला आहे. पाऊस कमी असल्याने यलो मोकसारख्या रोगामुळे मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे नुकसान झाले आहे. अगोदरच पावसाअभावी सोयाबीनला कमी प्रमाणात शेंगा आणि त्यातच सोंगणीच्या वेळेला कडकडीत उन्हामुळे शेंगांची टरफले फुटली. शेतातील सोयाबीन फुटीमुळे खरिपातील उत्पादन एकरी क्विंटल ते दीड क्विंटलचे नुकसान झाले आणि तेचरब्बीतही घातक ठरत आहे. सोयाबीन सोंगणीनंतर शेतकऱ्यांनी शेताची रोटाव्हिटर, वखरपास, करून आपल्या शेतीची मशागत केली आणि दुष्काळी परिस्थिती पाहता हरभऱ्याची घाईघाईने पेरणी करून घेतली. त्यानंतर स्प्रिंकलरने वरून पाणी दिल्यामुळे पेरणी केलेला हरभरा निघण्या अगोदरच सोयाबीन उगवले.रब्बी हंगामात , हरभरा, पेरणी केला. मात्र, आढाव सोयाबीन जास्त प्रमाणात उगवले आहे. तर ज्या पिकांची पेरणी केली, त्या पिकांची उगवण शक्ती कमी प्रमाणात झाली व सोयाबीन अगोदर उगवल्याने ही पिके दबून गेली आहेत.
त्यामुळे पेरणी केलेले पीक खुरपणीसाठी भरपूर पैसे लागतात. तर सोयाबीन पिकासाठी भरपूर प्रमाणात पाणी लागते. त्यामुळे कोणत्या पिकाचे संरक्षण करावे, हा प्रश्न शेतकऱ्यांना पडत आहे.