किनगाव जट्टू येथील बचत गटाची स्थापना
सिंदखेडराजा- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- किनगाव जट्टू येथे संविधान दिनाचे औचित साधून श्रीकृष्ण संसायता बचत गटाची स्थापना करण्यात आली.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहून प्रत्येक नागरिकांना जगण्याचा अधिकार व स्वातंत्र्य दिल्यामुळे, महिलांनी सुद्धा एकत्र येऊन प्रगतीची वाटचाल धरणे काळाची गरज आहे. यानुसार बचत गटाची स्थापना करण्यात आली, बचत गटाचे अध्यक्ष म्हणून कल्पना सातपुते व सचिव म्हणून आज वैशाली राऊत यांची निवड करण्यात आली. यावेळी सरला सोनी, गंगा जाधव, रंजना राऊत, लक्ष्मी राऊत, गीता राऊत, रुक्मिना माळोदे, अश्विनी वायाळकर, गीता वायाळकर, हजर होत्या. बचत गट स्थापन करण्यासाठी रेखा कायंदे यांनी मार्गदर्शन सहकार्य केले. तदनंतर संविधानाचे वाचन करून भावगीताने सभेची सांगता झाली