“ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या” देऊळगाव राजा तालुका” सचिव” पदी हनीफ शरीफ शेख तर चिखली तालुका “सचिव” पदी राहुल साहेबराव वाकोडे यांचे नियुक्ती.
सिंदखेडराजा -अनिल दराडे-आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- भारत सरकार नोंदणीकृत “माणुसकी सोशल फाउंडेशन संचालित” “ग्राहकभोक्ता संरक्षण समितीचे” राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष गंगारामजी उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली देऊळगाव राजा तालुका सचिव पदासाठी अंढेरा येथील सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार हनिफ शरीफ शेख तर चिखली तालुका सचिवपदी पांढरदेव येथील सामाजिक कार्यकर्ते राहुल साहेबराव वाकोडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सदर नियुक्त्या “ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीचे” संस्थापक अध्यक्ष दादासाहेब केदारे यांनी दिनांक 25 नोव्हेंबर 2023 रोजी ऑनलाइन नियुक्तीपत्र देऊन नियुक्ती केली आहे. या समितीच्या माध्यमातून आमच्यावर जी सचिव या पदासाठी जबाबदारी दिली आहे, त्या पदाचा मान राखून ज्या ग्राहकावर अन्याय होत असेल, ग्राहकांची फसवणूक होत असेल अशा ग्राहकांना योग्य पद्धतीने मार्गदर्शन करून त्यांना न्याय कसा मिळेल यासाठी ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय दादासाहेब केदारे व सर्व सन्मानिय वरिष्ठ पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली अहोरात्र कार्यरत राहून प्रयत्न करू अशी ग्वाही दिली. ग्राहकांची जागृती व समिती सोबत एकनिष्ठ राहून समितीच्या बळकटीकरणासाठी कार्य करत राहू असे यावेळी नवनियुक्त देउळगाव राजा तालुका सचिवपदी असलेले हनीफ शरीफ शेख व चिखली तालुका सचिव पदी नवनियुक्त राहुल साहेबराव वाकोडे यांनी यावेळी सांगितले. या दोघांच्या निवडीमुळे विविध स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.