Homeबुलढाणा घाटाखाली

शिवकालीन गडकिल्ले प्रतिकृती स्पर्धेतील विजेत्यांचे बक्षीस व प्रमाणपत्र देऊन केला गौरव !

Spread the love

नांदुरा :- आपलं बुलढाणा जिल्‍हा बातमी- नुकत्याच होऊन गेलेल्या दिपावली पर्वकाळात शहरात शिवकालीन गडकिल्ले प्रतिकृती बनवण्या ची स्पर्धा घेण्याचे आयोजन , ” माॅ. जिजाऊ सावित्री विचार मंच नांदुरा “, तसेच समविचारी इतर शिवप्रेमी संघटनांनी आयोजीत केलेली होती . या स्पर्धेला सकारात्मक प्रतिसाद देत शहरातील २१ बालमावळ्यांनी स्पर्धकांनी सहभाग नोंदऊन अतिशय मना पासून गड किल्ले साकारून शिवकालीन इतिहासाला एकप्रकारे ऊजाळा दिलेला होता .
माॅं जिजाऊ सावित्री विचार मंच चे वतीने परीक्षकांनी शहरातील शिवप्रेमी नियोजित स्पर्धेतील गड किल्ले प्रतिकृतींचे अवलोकन केले असता , त्यातील विशेषत्वाने शिवकालीन रचना व तो किल्ला प्रतिकृति बनवणाऱ्या बालमावळ्यास त्या बाबत माहिती वजा ईतिहास विचारून , तसेच किल्ले बनवण्या करिता प्राधान्याने निकषात घेतलेला नियम म्हणजे किल्ला बनवण्यास नैसर्गिक विघटन होणाऱ्या वस्तू जसे दगड – माती – विटा – गवत – लाकडी दरवाजे इ . वापरलेल्या असणे . तसेच किल्ला दर्शनी भागात असावा . पण अतिक्रमित जागेत नसावा . राबत्या सरकारी रस्त्या वर अडथळा नसवा . सोबतच कर्ण कर्कश आवाजातील स्पिकर व भपकेदार लायटींग नसलेले महत्वपुर्ण मुद्दे विचारात घेतले असता एकंदरीत नोंदणी कृत २१ स्पर्धकां पैकी वरिल सर्व निकषात बसणाऱ्या स्पर्धकांचे बक्षीसे व प्रमाण पत्र देऊन गौरवण्यात आले .
या मधे प्रथम तीन येणारांना अनुक्रमे रोख बक्षीस रक्कम प्रथम क्रमांक : अर्णव निलेश देशमुख, द्वितीय क्रमांक : चि. प्रेम अशोक पवार, तृतीय क्रमांक : अथर्व विजय गायकवाड यांना अनुक्रमे जगदीश आगरकर, मिलींदजी पाटील सर, किशोरराव देशमुख यांचे वतीने एका समारंभात प्रदान करण्यात आले. तसेच इतर सहभागी स्पर्धकांना प्रोत्साहन पर प्रमाणपत्र वितरित करून सर्व बालमावळ्यांचे कौतुक करण्यात आले .
रविवार दि.२६ नोहेंबर रोजी संपन्न झालेल्या कौतुक समारंभाचे अध्यक्षपदी माॅं जिजाऊ सावित्री विचार मंच चे संयोजक अशोकराव घनोकार, डॉ . शरद पाटील , प्रेमचंद जैन, संतोष गायकवाड, निलेश देशमुख ईत्यादी मान्यवर व्यासपिठावर ऊपस्थीत होते. या प्रसंगी डाॅ. शरद पाटील यांनी ऊपस्थीतांना मार्गदर्शन करून बालमावळ्यांचे अभिनंदनपर कौतुक केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page