एअर रायफल व पिस्टल चोरणारे दोन चोरटे पोलिसांच्या ताब्यात देऊळगाव राजा पोलिसांची दबंग कामगिरी
देऊळगाव राजा (आपलं बुलढाणा जिल्हा बातमी )- देऊळगाव राजा येथील जुना जालना रोड परिसरात असलेल्या एअर रायफल व पिस्टल विक्रीच्या दुकानातून ८ एअर रायफल तसेच २२ पिस्टल चोरी गेल्याची तक्रार फिर्यादी रविंद्र धन्नावत यांनी १६ ऑक्टोबर रोजी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात दिली होती. यावेळी आरोपींवर कलम ४६१,३८०,४३ भा.द.वी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भारत चिरडे यांच्याकडे सोपवण्यात आला होता. दरम्यान तपास सुरू असताना काल सोमवार,२७ नोव्हेंबर रोजी पोलिसांना माहिती मिळाली, काही तरुण बंदूक घेऊन बायपास परिसरात फिरत आहेत, माहितीच्या आधारे देऊळगाव राजा पोलिसांनी बायपास गाठले.
आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्या जवळील एअर रायफल ताब्यात घेण्यात आल्या. रोशनसिंग बबलूसिंग टाक २०वर्ष, हिरासिंग मोहनसिंग बावरे १९वर्ष अशी आरोपींची नावे असून दोघेही देऊळगाव राजा येथीलच राहणार आहे. दोन्ही आरोपी पोलीसांच्या ताब्यात असून त्यांच्या विचारपूसवेळी चोरी केल्याची कबुली आरोपींनी दिली. तसेच आज उर्वरित चोरीचा माल आरोपींकडून ताब्यात घेतला असून असा एक लाख 27 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलीस अधीक्षक महामुनी, उपविभागीय पोलीस अधीकारी देउळगाव राजा अजयकुमार मालविय, पोलीस निरीक्षक संतोष महल्ले, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भारत चिरडे, दत्ता नरवाडे तसेच पोहेकॉ रामकिसन गिते, भगवान नागरे, विश्वनाथ काकड, माधव कुटे, गणेश जायभाये, सैयद मुसा, नापोका अनिल देशमुख, महीला पोलीस अंमलदार शितल नांदे, चालक पोहेकॉ सुभाष मुंढे व विजय दराडे सर्व नेमणुक देउळगाव राजा पोलीस स्टेशन यांनी केली आहे.