जिल्हा सामान्य रूग्णालयात अवघ्या चार वर्षाच्या चिमुकल्या बालकाची मानाची डॉ ऋषीकेश निकम व त्यांच्या टिमने केली यशस्वी शस्त्रक्रिया…
अति जोखीमची असलेली हि शस्त्रक्रिया डॉ निकम आणि त्यांच्या टिमने करून दाखविली...
बुलढाणा- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी – असे म्हटले जाते की जगात देवाचे दुसरे रूप बघायचे असेल तर ते असते डॉक्टर कारण यांच्यामध्ये ते रूप दिसून येते असे कारण की माणसाला सुखरूप आणि व्यस्थित करण्याचे काम ते करत असतात.असे बऱ्याच ठिकाणी दिसून येते. जिल्हा सामान्य रूग्णालय येथे सुध्दा असे काही दिसून आले आहे.
अवघ्या चार वर्षाच्या बालकाची जन्मताच मान वाकडी होती. गेल्या चार वर्षापासून हा बालक त्रस्त होता. खुप त्रास हा त्याला सहन करावा लागत होता. मात्र या त्रासाला डॉ निकम व डॉ विरेंद्र काटकर व त्यांच्या टिमने पुर्णविराम दिला आहे.जिल्हा सामान्य रूग्णालय येथे दि २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास हि यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. चार वर्षाच्या या बालकाची मान हि जन्मताच वाकडी होती. याला टॉर्टीकोलीस असे म्हणतात. टॉर्टीकोलीस म्हणजे जन्मता मानेची स्नायू अकुंचन पावल्यामुळे मान एकाबाजूला वाकून मानेची हालचाल मंदावते त्यामुळे पेशंटला प्रचंड त्रास सहन करावा लागतो.
प्रणव भिसे असे या चार वर्षीय बालकाचे नाव असून त्याच्यावर जिल्हा सामान्य रूग्णालय येथे हि यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. हि अति जोखीमची मानेची शस्त्रक्रिया जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुभाष चव्हाण सर व अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ राठोड सर
यांच्या मार्गदर्शनाखाली अस्थिरोग तज्ञ डॉ ऋषीकेश निकम, अस्थिरोग तज्ञ डॉ विरेंद्र काटकर,भुलतज्ञ डॉ सुर्वणा सरोदे, डॉ. अविनाश सोळके व सर्व ओटी स्टाफ यांनी हि यश स्वी शस्त्रक्रिया केली आहे. यावेळी चिमुकल्या बालकाच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांचे आभार मानले.