उमरद येथे ग्रामसभा संपन्न
सिंदखेडराजा – आपलं बुलढाणा जिल्हा बातमी-अनिल दराडे- तालुक्यातील उमरद येथे ३० नोव्हेंबरला सरपंच निर्मला पंढरीनाथ उबाळे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत जवळील देवीच्या मंदिरासमोरील सभा मंडपामध्ये ग्रामसभा संपन्न झाली.
सचिव विनोद सातपुते यांनी विशेष सूची चे वाचन करून अनेक विषयावर चर्चा करण्यात आली, यावेळी मतदार यादीचे पुनर्नरीक्षण करणे बाबत यामध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने मतदार याद्या अद्यावत करण्याचे काम सुरू आहे त्यामुळे मतदार यादी मधील मयत मतदारांची नावे कमी करणे, अठरा वर्षे पूर्ण झालेल्या मतदारांचे नाव समाविष्ट करणे, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेचे लेबर बजेट तयार करणे, रमाई आवास योजना, मोदी आवास योजना, कृषी विभागाच्या वतीने पोखरा योजनेबाबत माहिती सांगण्यात आली, यावेळी सभेला प्रभाकर देशमुख, विठ्ठल बांबरगे, अरुण घायवट, दत्तू सानप, आनंदी शिनगारे, मनोहर देशमुख, राजू शिनगारे, पंढरीनाथ उबाळे, कृषी सहाय्यक मुंडे, संतोष गिरी, कोतवाल ढाकणे, सचिव विनोद सातपुते, ग्रामपंचायत कर्मचारी संजय कारभारी मुळे, संजय साहेबराव मुळे, अंगणवाडी सेविका, यांच्यासह गावकरी हजर होते