जिजामाता महाविद्यालयात विद्यापीठ पुरस्कृत संविधान जनजागृती कार्यशाळा संपन्न…
बुलढाणा- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती व्दारा संचालित स्थानिक जिजामाता महाविद्यालयात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती अंतर्गत कार्यरत डॉ बाबासाहेब आंबेडकर अभ्यास केन्द्राव्दारे पुरस्कृत संविधान जनजागृती कार्यशाळा आज दिनांक १ डिसेंबर २०२३ रोजी संपन्न झाली.
कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ प्रशांत कोठे, मार्गदर्शक म्हणून श्रीमती सुरजदेवी रामचंद्र मोहता महीला महाविद्यालय खामगांव येथील प्रा डॉ वसंत डोंगरे तसेच विचारपिठावर कार्यशाळेचे समन्वयक राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा डॉ जे जे जाधव, आयक्युएसी समन्वयक प्रा सुबोध चिंचोले, वाणिज्य विभाग प्रमुख प्रा डॉ सुरेश गवई,प्रा डॉ मिलिंद जाधव हे प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुरवातीला भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर व संत गाडगेबाबा यांचे प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा डॉ वसंत डोंगरे यांनी संविधान निर्मितीची ऐतिहासिक पार्श्वभूमी, संविधानाचा उद्देश व न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता धर्मनिरपेक्षता या मुल्यांचे महत्व विशद केले. त्याचबरोबर सामाजिक न्याय व सामाजिक कल्याण या अनुषंगाने संविधानाने वंचित व उपेक्षित घटकांच्या विकासासाठी संविधानाचे असलेले योगदान भाषणातुन स्पष्ट केले.
अध्यक्षस्थानावरून बोलतांना प्राचार्य डॉ प्रशांत कोठे यांनी सर्व विद्यार्थ्यांनी तसेच नागरीकांनी संविधानातील तत्वे आपल्या दैनंदिन जिवनात रुजवुन समाजाच्या विकासात व राष्ट्रीय ऐक्य आणी एकात्मतेत आपले योगदान देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. कार्यशाळेत सहभागी सर्वांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. उददेशीकेचे सामुहिक वाचन करून तसेच राष्टगिताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मार्गदर्शकांचा परिचय कार्यशाळेचे समन्वयक प्रा डॉ जे जे जाधव यांनी, आभारप्रदर्शन आयक्युएसी समन्वयक प्रा सुबोध चिंचोले यांनी तर सूत्रसंचालन प्रा डॉ अनंत मोरे यांनी केले. कार्यशाळेसाठी शहरातील विदर्भ महाविद्यालय , कला महाविद्यालय, समाजकार्य महाविद्यालय तसेच शासकीय महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच अनेक प्राध्यापक उपस्थित होते. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी प्रा डॉ अंनत देशपांडे, प्रा डॉ प्रदीप वाघ, प्रा डॉ राजश्री येवले ,प्रा डॉ पवन ठाकरे, प्रा.डी. जे.कांदे , अशोक जाधव, वामन पवार, युवराज डुकरे,विनोद आराख, श्री उमाळे , गजानन सुसर यांनी परीश्रम घेतले. कार्यशाळेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते