Homeक्राईम डायरीबुलढाणा (घाटावर)

वृध्देची पिशवी कापून चोरट्याने केले ३० हजार रुपये लंपास

Spread the love

चिखली- आपलं बुलढाणा जिल्‍हा बातमी :- ७८ वर्षीय वृद्ध महिलेने बचत खात्यातून काढलेल्या रकमेतील अज्ञाताने पिशवी कापून ३० हजार रुपये लंपास केले सदर घटना भारतीय स्टेट बँकेच्या उदयनगर. (उंद्री) शाखेत १ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. याबाबत हकीकत असी की येथील श्रीमती जिजाबाई चोखाजी साळवे रा. उदयनगर यांनी अमडापुर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली की माझा मुलगा सुभाष साळवे यांने मला २:३० वाजेच्या सुमारास स्टेट बँक शाखा उदयनगर येथे सोडले व तेथून निघून गेला नंतर मी माझे खात्यातून ४५ हजार रुपये काढले असता कॅशियरने १०० रुपयांच्या नोटांचे ४ बंडल व ५०० रुपयांच्या १० नोटा असे ४५ हजार रुपये दिले सदर पैसे मी माझे जवळ असलेल्या पिशवीत ठेवले व पासबुक नोंदी घेण्यासाठी लाईन मध्ये उभे राहले. नोंदी घेणे झाल्यानंतर मी माझ्या मुलाला मला घेण्यासाठी बँकेत बोलावले व त्याला पैसे देण्यासाठी पिशवीत हात घातला असता त्यातील अज्ञाताने पिशवी कापून त्यातील १०० रुपयांच्या नोटांचे ३ बंडल ३० हजार रुपये लंपास केल्याचे दिसून आले सदर घटना २:३० ते ३:१५ वाजेच्या दरम्यान घडली अशी फिर्याद अमडापुर पो.स्टे. ला दिल्यावरून अमडापुर पोलिसांनी अपराध क्र. ०३८१/ २०२३ कलम ३७९ नुसार दाखल केला असून पुढील तपास अमडापूर ठाणेदार सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उदयनगर पोलीस चौकीचे सुमेरसिंग ठाकुर करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page