३० वर्षीय विवाहितेचा वाईट उद्देशाने हात धरुन केला विनयभंग
खामगाव – आपलं बुलढाणा जिल्हा बातमी :- ३० वर्षीय विवाहितेचा वाईट उद्देशाने हात धरून विनयभंग केल्याची घटना स्थानिक शंकर नगर भागात उघडकीस आली. याप्रकरणी विवाहितेच्या तक्रारीवरून ३२ वर्षीय युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थानिक शंकर नगर भागातील ३० वर्षीय विवाहितेने शुक्रवारी शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली की, त्या सकाळी घरामागील बाथरूममध्ये आंघोळ करून घरात जात असतांना निलेश सुभाष हातेकर याने येऊन वाईट उद्देशाने हात धरला व तू माझ्याविरुद्ध पोलीस स्टेशनला रिपोर्ट का दिला, असे बोलून विवाहितेला तुझ्या मुलींना गायब करून परिवाराला जीवे मारून टाकेल अशी धमकी दिली. अशा तक्रारीवरुन खामगांव शहर पोलिसांनी निलेश हातेकर याच्याविरुद्ध कलम ३५४, ५०६ भादंवीनुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोहेकाँ मनोहर गोरे हे करीत आहेत.