भरधाव कारने स्कुटी व दुचाकीला उडविले दोघे जखमी…
खामगाव- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी :– भरधाव वेगातील कार चालकाने आधी एका स्कुटीला व नंतर एका दुचाकीला धडक दिल्याची घटना बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव रोडवरील विजयलक्ष्मी पेट्रोलपांसमोर घडली. या अपघातात एका मुलीसह दोघे जखमी झाले आहेत. खामगावकडून बुलढाणाकडे जाणाऱ्या कार क्र. एमएच १२एसक्यु ४४१८ च्या चालकाने त्याच्या ताब्यातील कार भरधाव व निष्काळजीपणे चालवून आधी एका मुलीच्या स्कुटीला धडक दिली. त्यानंतर त्याने पुढे जावून आणखी एका दुचाकीला ठोस मारली.
या अपघातानंतर सदर कारचालक घटनास्थळावरुन पळून गेला.
या अपघातात कु. शिफा ही व दुसरा एक दुचाकी चालक जखमी झाला. तसेच या दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. याबाबत सदर मुलीचे वडील मो. आरीफ मो. शफी वय ५० रा. गोंधनापूर यांनी शिवाजीनगर पोस्टेला तक्रार दिली असून पोलिसांनी याप्रकरणी उपरोक्त कार चालकाविरुध्द कलम २७९, ३३७,४२७ भादंवी सहकलम १३४ मोवाकानुसार गुन्हा दाखल केला आहे.