तीन राज्यांतील विजय हा आगामी “महाविजय-२०२४ ची नांदी- लोकसभा प्रमुख मा.आमदार विजयराज शिंदे
बुलढाणा- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा ,मध्य प्रदेश या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आज नुकतेच जाहीर झाले असून यामध्ये मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान तीन राज्यांत भाजपाने जबरदस्त बाजी मारली असुन स्वबळावर बहुमताने विजय मिळवून सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा केला आहे. या विजयाचा आज दि. ३ डिसेंबर २०२३ रोजी भाजपचे बुलढाणा लोकसभा प्रमुख मा.आमदार विजयराज शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालय शिवालय येथे जल्लोष करण्यात आला.
भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व भारतीय जनता पक्षाचा जयघोष करत शिवालय परिसर दणाणून सोडला होता. तसेच भाजपा नेते विजयराज शिंदे व कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढा भरवून या विजयाबद्दल आनंद व्यक्त केला. यावेळी विजयराज शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या “तीन राज्यातील नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा विश्वास ठेवून लोकमताचा स्पष्ट कौल भाजपला दिला आहे तिन्ही राज्यात स्वबळा भाजपा सत्ता स्थापन करणार आहे, त्यामुळे हा विजय म्हणजे महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील आगामी महाविजय-२०२४ च्या विजयाची नांदीच आहे” असे प्रतिपादन करत सर्व भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते व मतदारांचे अभिनंदन व जाहीर आभार व्यक्त केले.
यावेळी शिवालय येथे जल्लोष साजरा करण्यासाठी भाजपा प्रदेश प्रतिनिधी श्री दीपकदादा वारे, कामगार मोर्चा प्रदेश सचिव श्री विश्राम पवार, प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्री अण्णासाहेब पवार, प्रदेश सचिव सौ शालिनीताई बुंधे, जिल्हा उपाध्यक्ष श्री योगेश सावंत, शहराध्यक्ष श्री अनंता शिंदे,भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष श्री विनायक भाग्यवंत, कामगार मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री दत्ता शिंदे, सौ स्मिताताई चेकेटकर, सौ सिंधुताई खेडेकर, महिला जिल्हा सरचिटणीस सौ उषाताई पवार,महिला जिल्हा उपाध्यक्ष सौ अलकाताई पाठक,ऍड किरणताई राठोड, कामगार मोर्चा तालुकाध्यक्ष श्री राजेंद्र पवार,कामगार मोर्चा शहराध्यक्ष रशीद शेख, उपाध्यक्ष श्री हाजीभाई, सरपंच अर्जुन दांडगे, अनिकेत गवळी, गणेश पांडे,प्रदीप तोटे, प्रकाश राजगुरे,यश तायडे, अशोक बाहेकर ,गजानन देशमुख ,नारायण देशमुख , अमोल जाधव,ऋषिकेश गोरे,सचिन सूर्यवंशी,किरण नाईक,यतीन पाठक यांसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.