आ. धिरज लिंगाडे यांची विधान परिषद सभापती तालिकेवर नियुक्ती
बुलढाणा-आपलं बुलढाणा जिल्हा बातमी :- नागपूर हिवाळी अधिवेशन २०२३ करिता विधान परिषद सभापती तालिकेवर आमदार धिरज रामभाऊ लिंगाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आमदार धिरज लिंगाडे यांच्या पहिल्याच टर्मच्या दोन्ही अधिवेशनातील उल्लेखनीय व अभ्यासपूर्ण कामकाजामुळे काँग्रेस पक्षाने ही महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर सोपविली आहे.
महाराष्ट्र विधानमंडळ काँग्रेस पक्ष नेते बाळासाहेब थोरात यांनी मा. प्रधान सचिव वर्ग (१) महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय विधान भवन नागपूर यांना पत्राद्वारे आमदार धिरज लिंगाडे यांचे नामनिर्देशित केले आहे. त्या अनुषंगाने विधान परिषद सभापती व उपसभापती यांनी आमदार धिरज लिंगाडे यांची विधान परिषद सभापती तालिकेवर नियुक्ती केली आहे. ही घोषणा विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोहे यांनी विधान परिषदेत केली.