समता संघटनेचा हिवाळी अधिवेशनावर मोर्चा
बुलढाणा-आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- भूमिहीनांनी शेती प्रयोजनार्थ बऱ्याच कालावधीपासून केलेले अतिक्रमण नियमानुकूल करणे यासह आदी विविध मागण्यांसाठी समता संघटनेच्यावतीने 19 डिसेंबर रोजी नागपूर हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढता येणार आहे. तसे निवेदन संघटनेच्यवतीने जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.
भूमीहीन, शेतमजूर, अनुसूचित जाती जमाती, भटके विमुक्त अन्य मागास प्रवर्गातील व आर्थिक दृष्ट्या दुर्बल लोकांनी गायरान कसणाऱ्यांची आजपर्यंत केलेली अतिक्रमणे नियमानुकूल करून मालकी हक्काची पट्टे वाटप करण्यात यावे, वनहक्क कायद्यातंर्गत प्रलंबित दाव्यावर निर्णय घेऊन तात्काळ पट्टेवाटप करण्यात यावे, मुख्यमंत्री सौर कृषी वाहीनी प्रकल्प वहीतीखालील असलेल्या गायरानावर न घेता इतर पड जमिनीवर घेण्यात यावा, यासाठी झालेले आदेश रद्द करण्याच्या मागण्यााठी समता संघटनेचे नागपूर हिवाळी अधिवेशनावर १९ डिसेंबर रोजी अधिवेशनात शेतीसाठी झालेली अतिक्रमणे नियमानुकूल करण्याचा निर्णय घेण्यासाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर समता संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नितीनभाऊ गवई, जिल्हाध्यक्ष अरुण भालेराव, विजय दोडे, गजानन जाधव यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.