Homeक्राईम डायरीबुलढाणा (घाटावर)

उदयनगर येथे २ घरे फोडून दीड लाखाचा ऐवज लंपास

Spread the love

चिखली -आपलं बुलढाणा जिल्‍हा बातमी:- उदयनगर येथे गेल्या १५ दिवसांपासून चोरीच्या घटना सुरूच असून अज्ञात चोरट्यांनी पुन्हा गिरीश कलंत्री व दायमा यांचे घर फोडून जवळपास दीड लाखाचा ऐवज लंपास केला सदर घटना ९ डिसेंबर रोजी सकाळी उघडकीस आली असून अमडापुर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. येथील मारवाडी गल्लीतील बाहेरून कुलूप लावलेली बंद असलेली घरे चोरट्यांनी टार्गेट करून फोडले यामध्ये गिरीश कलंत्री यांचे घर अज्ञात चोरट्याने कुलूप तोडून घरात प्रवेश करीत कपाट फोडले यामधील चांदीचा लोटा वजन ३०० ग्राम किं. २४००० हजार रुपये, चांदीचे २ ग्लास वजन ३८० ग्रॅम २२००० व इतर अधिक रोख ४० हजार रुपये असे १ लाख ०२ हजार रुपयांचा ऐवज तर दायमा यांचे घर अज्ञात चोरट्यांनी कुलूप फोडून आत प्रवेश करीत कपाट फोडून त्यातील सोन्याचे मनी २० नग, टाप्स, पायातील चैन पट्टी, जोडवे असे एकूण १ लाख ४५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला या सोबतच अधिक इतरही दोन-तीन घरे फोडल्याची माहिती आहे याबाबतची लेखी फिर्याद गिरीश शामलाल कलंत्री वय ४२ वर्ष रा. उदयनगर यांनी अमडापुर पोलीस स्टेशनला दिल्यावरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध अप. क्रमांक ०३८६ / २०२३ भा. द. वि. कलम ४५७, ३८० नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास अमडापुर पोलीस करीत आहे. तर घटनास्थळी श्वानला ही पाचारण करण्यात आले होते. सदर श्वान ने गिरीश कलंत्री यांचे घर नंतर ढोले, टेकाळे, दायमा यांचे घरानंतर माऊली नगर कडे मार्ग दाखविला तर ठसे तज्ञांनाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते.

उदयनगर येथे गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटना सुरू असून स्टेट बँकेतून दिवसाढवळ्या ७८ वर्षे वृद्ध महिलेची पिशवी कापून ३० हजार रुपये लंपास केले नंतर पुन्हा दोन घरे फोडली होती. तर पुन्हा चोरीच्या घटना सुरूच असल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून गजानन महाराज मंदिर परिसरातील काही युवकांकडून रात्रीचे जागरण सुद्धा करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page