अज्ञात वाहनाच्या धडकेत मनोरुग्ण गंभीर
नांदुरा:-आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- जळगाव जामोद रोडवर पायी चालत जाणाऱ्या मनोरुग्णाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाल्याची घटना ७डिसेंबर च्या रात्री ८वाजता घडली.
सविस्तर असे की नारायणपूर ता नांदुरा येथील रवी खैरे हा मनोरुग्ण ७डिसेंबरच्या रात्री ८ वाजेदरम्यान नांदुरा जळगाव (जामोद) रस्त्याने पायी चालत जात असतांना त्याला कोण्यातरी अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला. अपघाताची वार्ता कळताच नांदुरा पीएचसीच्या १०८ रुग्णवाहिकेचे डॉ शेख चालक गणेश वनारे व किशोर क्षीरसागर यांनी रुग्णवाहिकेसह घटनास्थळी तातडीने धाव घेत गंभीर जखमीला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले.
यावेळी डॉ जैस्वाल यांनी जखमी वर उपचार केले मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी खामगावला हलविण्यात आले तिथूनही रात्री उशिरा अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात भरती करण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे.