आरोग्यवर्धिनी केंद्र नांदुरा परिसरा मध्ये घाणीचे साम्राज्य
नांदुरा :-आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- तालुक्यातील आरोग्यवर्धिनी केंद्र नांदुरा येथे कोणत्याही प्रकारची स्वच्छता केली जात नाही. असे दिसून येते तालुक्यातील सर्व गोरगरीब जनता आपल्या बिमारीचा इलाज करण्यासाठी नांदुरा येथे येत असतात पण या आरोग्यवर्धिनी केंद्र नांदुरा येथे कोणत्याही प्रकारची स्वच्छता केली जात नाही,
केंद्र सरकार असो की राज्य सरकार असो स्वच्छतेवर कोट्यावधी रुपये खर्च करून सुद्धा या केंद्राला स्वच्छ परिसर ठेवनची आवश्यकता आहे , अधिकारी वर्गाचे या घाणीकडे कोणत्याही प्रकारचे लक्ष देत नसल्यामुळे घाणीचे साम्राज्य झाले आहे, या आरोग्यवर्धिनी केंद्र नांदुरा येथे लहान, मोठे, गर्भवती महिला या केंद्राकडे आपला इलाज करण्यासाठी दवाखान्यांमध्ये येतात,शासनाचा भरमसाठ निधी उपलब्ध होत असूनही गरोदर महिला, अपंग बांधव आणि विविध रोगाविषयी त्रस्त असलेल्या रुग्णांना अपुऱ्या सुविधा मिळत असल्याची नागरिकान कडून खंत, तसेच तालुकास्तरावर आरोग्यवर्धिनी केंद्र असून या केंद्रामध्ये नागरिकांना पाण्याची व्यवस्था केली जात नाही, तसेच अनेक प्रकारच्या सुविधा नागरिकांना देण्यात येत नाही, वरिष्ठ अधिकारी याकडे लक्ष देतील का? सरकार या आरोग्य विभागावर एवढा मोठा खर्च करून हे आरोग्य वर्धिनी केंद्र नांदुरा का परिसर स्वच्छ ठेवत नाही? याकडे सर्वसामान्य लक्ष लागले आहे.