काँग्रेसचे खा.साहू यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला भाजपा महिलांनी काळे फासून मारले जोडे
भ्रष्टाचारी काँग्रेसचा खरा चेहरा जनते समोर येतोय -- मा.आमदार विजयराज शिंदे
बुलढाणा:-आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- झारखंड राज्यातील काँग्रेसचे राज्यसभा सदस्य खा. श्री धीरज साहू यांच्यावर कर विभागाने छापे मारून त्यांच्याकडून 350 कोटी रुपयांच्या वर अवैद्य रोकड जप्त केली आहे व हा आकडा वाढतच आहे.या अशा खासदार व भ्रष्टाचारी काँग्रेस प्रवृत्तीच्या विरुद्ध आज भाजपा लोकसभा निवडणूक प्रमुख माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या नेतृत्वात तसेच भाजपा महिला मोर्चाच्या वतीने आज दि.११.१२.२०२३ रोजी वसंतराव नाईक चौकात खा. धीरज साहू यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपला मारून काळे फासण्यात आले व काँग्रेसचा निषेध नोंदवण्यात आला.
” जनतेच्या घामाच्या पैशावर अश्याप्रकारे डल्ला मारणाऱ्या एका खासदाराकडे एवढी संपत्ती असेल तर काँग्रेसच्या इतर नेत्यांकडे किती असेल? याचा अंदाज सुद्धा आपल्या अवाक्या बाहेरचा आहे. मागील सहा दिवसांपासून कर विभागाचे 50 कर्मचारी रोकड हस्तगत करीत असून यात वाढत होत जात आहे. काँग्रेसची ही भ्रष्टाचारी प्रवृत्ती, हा चेहरा खऱ्या अर्थाने जनतेसमोर समोर येत आहे त्यामुळे काँग्रेस मुक्त भारत निर्माण करण्याची वेळ जवळ आली आहे” अशा खरपूस शब्दात भाजपा नेते विजयराज शिंदे यांनी काँग्रेसचे खासदार व काँग्रेस पक्षाचा निषेध व्यक्त केला.
यावेळी भाजपाच्या महिला मोर्च्या जिल्हा सरचिटणीस सौ उषाताई पवार, महिला जिल्हा उपाध्यक्ष सौ अल्काताई पाठक, माजी नगरसेविका सौ वैजंतीताई कस्तुरे, सौ योगिताताई बढे ई महिलांनी खा.साहू यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपला मारून काळे फासले. तसेच सदर खासदार व काँग्रेसच्या मुर्दाबाद घोषनांनी परिसर दणाणून सोडला.
या निषेध आंदोलनात भाजपा तालुका अध्यक्ष मोहन पवार भाजपा कामगार मोर्चा प्रदेश सचिव श्री विश्राम पवार कामगार मोर्चा प्रदेश प्रतिनिधी श्री अण्णासाहेब पवार, शहराध्यक्ष श्री अनंता शिंदे कामगार मोर्चाचे जिल्हाध्यक्ष दत्ता शिंदे सतीश पाटील , शिक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रा भगवान गरुडे, श्री रदाळकर श्री संजय साखरे, किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस मंदार बाहेकर, माजी नगरसेवक अरविंद होंडे कामगार मोर्चा तालुकाध्यक्ष,राजेंद्र पवार , एड. दशरथसिंग राजपूत, अनिकेत गवळी, अमोल जाधव डॉक्टर, डॉ आनंद रिंढे, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष भगवान एकडे, यश तायडे, संतोष पालकर, श्री गणेश देहाडराय, भाजयुमो जिल्हा सरचिटणीस विनायक भाग्यवंत प्रदीप तोटे,प्रदीप सोनटक्के, शेषराव गावंडे, विठ्ठल नरोटे यांसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या उपस्थित होते.