महामार्गावरील बॅरिअर पट्टया घेऊन जातांना दोघांना पकडले
मेहकर तालुक्यातील चौघे रहिवासी, दोघे फरार
किनगाव राजा -आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- (निलेश डिघोळे) सिंदखेड राजा ते मेहकर राज्य महामार्गावर लावण्यात आलेल्या बॅरिअर पट्ट्याच खोलून नेण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नागरिकांच्या जीवित्वास धोका निर्माण झाल्यास अपघाताच्या दृष्टीने सुरक्षा म्हणून लावण्यात आलेल्या बॅरिकेट्स वरच चोरटे हात साफ करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर किनगावराजा पोलिसांनी ५ लाख ५४ हजारांजा मुद्देमाल जप्त करत मेहकर तालुक्यातील दोघांना अटक केली आहे. तर दोघे फरार झाले आहे हि घटना दि.९ डिसेंबर रोजी उघडकीस आली.
याबाबत सविस्तर असे की, दुसरबीडहुन मेहकरकडे जात असताना ३ कि.मी. अंतरावर दुसरबीड शिवारातील राज्य महामार्ग क्रमांक ७५३ सी वरील नगरमाळावरील अपघाताच्या दृष्टीने सुरक्षेकरिता रोड लगत लवलेल्या कॅश बरियर पट्टया खोलतांना काही अनोळखी व्यक्ती गावातील नागरिकांनी बघितले. यावरून नागरिकांनी किनगावराजा पोलिसांना संपर्क केला असता यातील आरोपी वैभव वाळुकर रा.कनका ता.मेहकर व माधव वाघ रा.मोहना खुर्द ता.मेहकर मिळुन आले तर आरोपी दडू हांडे व बालू ठोकळ दोघे रा.कनका ता.मेहकर हे फरार झाले.
यावेळी कॅश बरियर पट्टया २३ नग अंदाजे किंमत प्रत्येकी दहा हजार रुपये प्रमाणे २ लाख ३० हजार रुपये, प्रेशर पटया २३ नग अंदाजे किंमत प्रत्येकी १ हजार रुपये प्रमाणे २३ हजार रुपये, नट बोल्ट अंदाजे १ हजार रुपये असा एकुन २ लाख ५४ हजार रुपयाचा मुददेमाल पांढ-या रंगाची महिंद्रा कंपनीचे बोलेरो क्रमांक एम. एच २८-ए. बी.३६२९ अंदाजे किंमत ३ लाख रुपये असा एकूण ५ लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून वैभव वाळुकर व माधव वाघ यांना अटक करण्यात आली आहे.
पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी बारगजे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून २८७/२०२३ कलम ३७९,३४ भादवी, सहकलम ३ सार्वजणीक संपती नुसकान प्रतिबंद अधि, सन १९८४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार दत्तात्रय वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार गणेश डोईफोडे, नाजीम चौधरी हे करत आहे.