Homeक्राईम डायरीबुलढाणा (घाटाखाली)

न.प.चे मुख्याधिकारी व विद्युत पर्यवेक्षक यांना लाच घेतांना रंगेहाथ पकडले

Spread the love

जळगाव जामोद-आपलं बुलढाणा जिल्‍हा बातमी- येथील न.प.चे मुख्याधिकारी आणि न.प.चे विद्युत पर्यवेक्षक यांनी मागितलेली १२ हजार रुपयांची लाच स्वीकारताना या दोघांना दि १३ डिसेंबर रोजी एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले.जळगांव शहरातील पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीच्या कामाचे बिल अदा केल्याचा मोबदला म्हणून संबंधित ठेकेदाराकडून मुख्याधिकारी आणि विद्युत पर्यवेक्षक या दोघांनीही लाच मागितली होती. लाच देण्याचा निर्णय संबंधित ठेकेदाराने घेतला व या संबंधीची तक्रार ठेकेदाराने अँटी करप्शन ब्युरो कडे केली होती. त्यांनी म्हटले होते

की विद्युत पर्यवेक्षक दीपक शेळके यांनी स्वतःसाठी ६ हजार रुपये व मुख्याधिकारी आकाश डोईफोडे यांच्यासाठी ६ हजार रुपये अशी एकुण १२ हजार रुपयाची मागणी केली त्यांच्या तक्रारीवरून अँटी करप्शन ब्युरोच्या पथकाने १३ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारात सापळा रचून जळगाव जामोदचे ३२ वर्षीय मुख्याधिकारी आकाश डोईफोडे आणि विद्युत पर्यवेक्षक दीपक शेळके (३० वर्ष) या दोघांना तक्रारदाराकडून १२ हजार रुपयांची लाच घेताना नगर परिषदेतच रंगेहात पकडले. त्यानंतर शासकीय विश्रामगृह येथे दोन्ही आरोपींची चौकशी करण्यात आली. ही धाडसी कारवाई मारुती जगताप, पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्र,देविदास घेवारे, अपर पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्र, यांच्‍या मार्गदर्शनाखाली         पो. उपअधिक्षक श्रीमती शितल घोगरे व पो नि सचिन इंगळे, महेश भोसले सापळा पथक स.फौ. शाम भांगे, पोहेकॉ. विलास साखरे, प्रवीण बैरागी, रवी दळवी, पो ना जगदीश पवार, विनोद लोखंडे, पोकॉ शैलेश सोनवणे, म.पो.कॉ. स्वाती वाणी आणि चालक पोना नितीन शेटे, पोकों अरशद शेख बुलढाणा यांच्या पथकाने केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page