जिल्हा परिषदेची सरळसेवा भरती प्रक्रिया 2023 प्रवेशपत्र डाऊनलोड करून घ्या
बुलढाणा- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- ग्रामविकास व पंचायतराज विभागांतर्गत जिल्हा परिषदेतील गट-क मधील विविध संवर्गातील शासनस्तरावरुन राबविण्यात येत असलेल्या भरती प्रक्रियेसाठी जाहीरात क्र. 1/2023 दिनांक 5 ऑगस्ट 2023 नुसार प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवारांनी या जाहिरातीचे प्रवेशपत्र डाऊनलोड करून घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
त्यानुसार सरळसेवा भरती प्रक्रिया 2023साठी कनिष्ठ सहाय्यक या संवर्गाची परीक्षा दिनांक 18, 19 व 20 डिसेंबर 2023 रोजी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या संवर्गाची परीक्षा दिनांक 23 व 24 डिसेंबर 2023 आणि औषध निर्माण अधिकारी या संवर्गाची परीक्षा दिनांक 21 व 26 डिसेंबर 2023 रोजी होणार असल्याने या संवर्गातील परीक्षेसाठी प्रवेशपत्र उपलब्ध होण्यासाठी जिल्हा परिषद बुलढाणा च्या www.zpbuldhana.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे. याबाबत संबंधित उमेदवारांनी नोंद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे, नोडल अधिकारी तथा उप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) आशिष विवार यांनी केले आहे.