राजे छत्रपती कला महाविद्यालय येथे अल्पसंख्यांक दिन साजरा
मोताळा : आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- तालुक्यातील धामणगाव बढे येथील राजे छत्रपती कला महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने अल्पसंख्यांक दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राध्यापक शशिकांत शिरसाठ होते तर प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर स्वप्नील दांदळे, डॉ. कामिनी ह्या होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक डॉक्टर गोविंद गायकी यांनी प्रास्ताविक केले.
याप्रसंगी निबंध वाचन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये सरिता बडे व तन्वी काठोळे यांचा प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक कुमारी आरती सोनवणे तर तृतीय क्रमांक दीक्षा वाकोडे व स्नेहल हुडेकर यांना विभागून देण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉक्टर स्वप्नील दांदडे यांनी अल्पसंख्यांक यांचे हक्क यावर प्रकाश टाकला तर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक शशिकांत शिरसाठ यांनी ही या कार्यक्रमा विषयी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉक्टर गजानन वानखेडे यांनी केले.