पत्रकार भगवान साळवे यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार पत्रकारिता पुरस्कार जाहीर
सिंदखेड राजा-आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- पत्रकार क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल पुण्य नगरी तालुका प्रतिनिधी तथा व्हॉईस ऑफ मिडिया चे सिंदखेड राजा तालुका कार्याध्यक्ष भगवान साळवे यांना मातोश्री वच्छलाबाई गवई शैक्षणिक संस्था साखरखेर्डा व दैनिक महाराष्ट्र सारथी यांच्याकडून मनाचा डॉ बाबासाहेब आंबेडकर पत्रकरिता पुरस्कार जाहीर झाला आहे
पत्रकार भगवान साळवे यांनी लोकमत एकमत या वर्तमानपत्रात उपसंपादक म्हणून काम केले आहे सध्या पुण्यनगरीमध्ये सिंदखेड राजा तालुका प्रतिनिधी म्हणून काम करत आहे त्यांनी अनेक प्रश्नाला वाचा फोडली आहे सामाजिक राजकीय लिखाण करून शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांनी आपल्या लेखणीतून मांडले आहेत गेली 25 वर्ष पत्रकारिता क्षेत्रांमध्ये त्यांनी आपला ठसा उमटवला आहे सदर पुरस्कार 30 तारखेला एका शानदार समारंभामध्ये प्रदान करण्यात येणार आहे त्यांना हा मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे