विहिरीत बुडून शेतकऱ्याचा मृत्यू
चिखली- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- अंढेरा येथील शेतकरी शिवनाथ जगन्नाथ शिंदे (वय ५० वर्ष) यांचा मोटरपम्प सुरू करण्यासाठी विहीरीवर पाय घसरून पाण्यात बुडुन मृत्यू झाल्याची घटना २० डिसेंबर रोजी दुपारी ३- ३० घडली.देऊळगाव राजा तालुक्यातील पाडळी शिंदे येथील रहिवासी शिवनाथ जगन्नाथ शिंदे हे पिकांना पाणी देण्यासाठी शेतात गेले असता विहिरीवरील मोटारपपं पाणी येत नसल्याने पाईप हलविण्याचा प्रयत्न करीत असताना तोल जाऊन विहिरीच्या पाण्यात पडून बूडाल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना २० डिसेंबर बुधवारी दुपारी साडे तीन वाजता घडली सदर घटनेची माहिती पोलीस पाटील भारत शिंदे यांनी पोलीस स्टेशन ला दिली असता पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले त्यात वाघ, गोरख राठोड, रामेश्वर आंधळे यांनी धाव घेत सदर मृतदेह तातडीने ग्रामस्थ यांच्या मदतीने विहिरीत गळ सोडून बाजेवर मृतदेह पाण्यातुन बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी देऊळगाव मही येथील ग्रामीण रुग्णालयात नेऊन रात्री शोकाकुल वातावरण अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा आप्त परिवार आहे