बुलडाणा, लोणार तालुक्यात दुष्काळसदृश्य सवलती लागू
बुलढाणा:-आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील बुलढाणा व लोणार तालुक्यामध्ये मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार शासनाच्या महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयानुसार दिनांक 10 नोव्हेंबर 2023 नुसार बुलढाणा जिल्ह्यातील 11 तालुक्यामधील 73 महसुली मंडळामध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती घोषित करण्यात आली आहे. दुष्काळ घोषित झालेल्या तालुक्यांमध्ये जमीन महसूलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती देणे, कृषी पंपांच्या चालू विज बिलात 33.5 टक्के इतकी सूट, शालेय, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरवठ्यासाठी टँकर्सचा वापर आणि टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतक-यांच्या शेतीच्या पंपाची विज जोडणी खंडीत न करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिले आहेत.