मोताळ्यानंतर आता मलकापूर तालुक्यातही गांजाची शेती, टाकलेल्या छाप्यात लाखोंचा कच्चा गांजा जप्त
मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनची कारवाई....
मलकापूर, (आपलं बुलढाणा जिल्हा बातमी) मलकापूर ग्रामीण पोलिसांनी तालुक्यातील हिंगणाकाझी शिवारात शुक्रवारी रात्री ९ वाजता धाड घातली. त्यात गट क्रमांक ५२ मधील सुभाष भागवत पाखरे त्याने अतिक्रमण केलेल्या शेतात गहू, कपाशी व तूर या पिकांसोबत स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीररीत्या गांजाची ७३ झाडे लावल्याची माहिती समोर आली सविस्तर वृत्त अशे की मलकापूर तालुक्यातील हिंगणाकाझी शिवारात मध्ये मलकापूर ग्रामीण पोलिसांनी छापा टाकला गट क्रमांक ५२ मधील शेतात गांजाची तब्बल ७३ झाडे लावण्यात आल्याचे आढळून आले त्या झाडांचे वजन १ क्विंटल ८५ किलो ७७ ग्रॅम इतके आहे. तर त्या पिकाची एकूण किंमत सुमारे १८ लाख ५७ हजार ७०० रुपये आहे. शेतकरी बेकायदेशीरपणे गांजाची झाडे लावून संवर्धन व जोपासना करीत असल्याचे पोलिस कारवाईत आढळून आले. या घटनेत ग्रामीण पोलिसांनी सुभाष भागवत पाखरे रा. भालेगाव, ता. मलकापूर यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम २० एनपीडीएस कायद्यान्वये शनिवारी पहाटे ३ वाजता गुन्हा दाखल केला. शेतकऱ्यास मुद्देमालासह गजाआड करण्यात आले. मलकापूर ग्रामीण पोलिस निरीक्षक संदीप काळे, उपनिरीक्षक प्रशांत राठोड, हे पुढील कारवाई करीत आहेत .