वीज वितरण कर्मचाऱ्यांच्या वतीने आमदार संजय गायकवाड यांचा सत्कार
बुलढाणा :-आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- इतरांना उजेड देणारा लाईनमन हा मात्र विविध समस्यांच्या अंधारात असून, लाईनमन स्टाफ बचाव कृती समितीने केलेल्या आंदोलनाची दखल घेवून त्यांच्या मागण्या तात्काळ सोडविण्यासंदर्भात आ. संजय गायकवाड यांनी अधिवेशनात आवज उठविला.त्यामुळे लाईनमन स्टाफ बचाव कृती समितीच्या वतीने आज दि २३ डिसेंबर रोजी बुलढाणा विधानसभेचे आमदार संजय गायकवाड यांचा त्यांच्या जनसंपर्क कार्यालय मातोश्री येथे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आहे.
मंगळवार १९ डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्याच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान बुलढाणा विधानसभा मतदार संघाचे आ. संजय गायकवाड यांनी सभागृहात लक्षवेधी दरम्यान बोलताना महाराष्ट्र राज्य वीज महामंडळ ते महावितरण कंपनीपर्यंतचा कार्यकाळ पाहता तळागाळामध्ये कार्यरत असणारे लाईनस्टाफ कर्मचारी यांच्या ज्वलंत प्रश्नासंदर्भात शासन स्तरावर अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक मानव संसाधन स्तरावर अनेक बैठका झाल्या आहेत. त्यांच्या न्यायहक्क मागण्यासंदर्भात कोणताही ठोस निर्णय न झाल्यामुळे गेल्या अनेक दिवसापासून महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे लाईनस्टाफ बचाव कृती समिती यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान आंदोलनाच्या इशारा दिला होता आणि त्यांचे आंदोलन सुरू आहे, या कर्मचाऱ्यांच्या संदर्भामध्ये आतापर्यंत शासनाने तातडीने निर्णय घ्यावा याकरिता शासनाने संबंधित मंत्री महोदयांना बचाव कृती समितीच्या मागण्या मान्य कराव्या ही महत्वपूर्ण मागणी यावेळी केली.हिवाळी अधिवेशनात सर्व आमदारांना निवेदन देण्यात आले होते.ह्या आमच्या मागण्या अधिवेशनात मांडा मात्र त्या कोणीच मांडल्या नाही मात्र बुलढाणा विधानसभा मतदार संघाचे आमदार संजय गायकवाड यांनी या मागण्या अधिवेशनात मांडल्या त्यामुळे आज कर्मचाऱ्यांच्या वतीने आज त्यांचा सत्कार करण्यात आले आहे.