साकेगाव येथील विकास निकाळजे यांची BSF पदी निवड
चिखली :-आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- साकेगाव येथील सामान्य कुटुंबातील विकास कडूबा निकाळजे या युवकाने उरात जिद्द बाळगून परिस्थितीची जाणीव ठेऊन अतिशय मेहनत घेऊन केंद्राच्या BSF पदाला गवसणी घातली विकासचे बालपणीचे शिक्षण ७पर्यत जि.प.शाळेत गावातच झाले पुढील शिक्षण १० पर्यंत गावातील शिवाजी विद्यालयात झाले. घरची परिस्थिती जेमतेम असल्यामुळे आई वडिलांनी शेती मजुरी करून पुढील शिक्षण शिकवले.
विकास ने या आगोदर प्रयत्न केले होते त्याला यश न आल्याने विकास पुन्हा त्या जोशाने न खचाता त्याच जिद्दीने पुन्हा पेटून आपल्या आई वडिलांच्या कष्टाचे चीज करून आज त्याने BSF मध्ये SC प्रवर्गामधून प्रथम येऊन गावचे तालुक्याचे नाव उंचावले असून सर्व क्षेत्रातून त्याचे कौतुक /अभिनंदन चा वर्षाव होत आहे