चिखलीत आढळला एक कोरोनाच्या नवीन उपप्रकार जेएन १ ची लागण
नागरिकांनी काळजी घ्यावी
बुलढाणा – आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- कोरोना विषाणूचा नवीन जेएन-१ या उपप्रकाराचा प्रादुर्भाव वाढण्यास सुरुवात झाली असून, याची लागण झालेला पहिला रुग्ण बुलडाणा जिल्ह्यातील चिखली शहरात आढळला आहे. यामुळे नागरिकांना या विषाणूची धास्ती वाढली आहे. मात्र लक्षणे सौम्य आहेत, त्यामुळे नागरिकांनी काळजी करू नये, असा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे.
या विषाणूचा राज्यात काही दिवसांपासून धुमाकूळ घालतल्याने कोविडचा संसर्ग होण्यास सुरुवात झाली आहे.
नव्या वर्षात याचा फैलाव जोरात होताना दिसून येत आहे. चिखली शहरातील एका ४८ वर्षीय आरोग्य कर्मचाऱ्याला कोरोनाची काही लक्षणे जाणवल्याने त्यांनी ‘रॅपिड टेस्ट’ केली असता त्यांचा अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आला आहे. सदर आरोग्य कर्मचारी आठवड्यातील ३ दिवस बुलढाणा तर ३ दिवस चिखली येथे सेवा देतात. अंगदुखी, ताप, खोकला अशी सौम्य लक्षणे आढळून आल्याने त्यांनी तपासणी करून घेतली. त्यात संसर्ग झाल्याचे आढळून आले. सध्या त्यांच्यावर गृहविलगीकरणात उपचार सुरू आहेत. तरी नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहेत.