कोरेगाव भीमा शौर्य दिनानिमित्त बुलढाणा शहरात निघाली भव्य मोटारसायकल रॅली
कोरेगाव भीमा शौर्य दिनानिमित्त आमदार संजय गायकवाड यांनी केले अभिवादन
बुलढाणा – आपलं बुलढाणा जिल्हा बातमी :- असीम शौर्याचे प्रतीक असलेला विजयस्तंभ सर्वांना शौर्य,समता आणि न्यायाची सदैव प्रेरणा देत राहील. दि १ जानेवारी २०२४ रोजी ऐतिहासिक २०६ व्या शौर्यदिनानिमित्त बुलढाणा शहरात भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. सुंदरखेड येथुन या रॅलीला सुरुवात करण्यात आली. सुंदरखेड पासुन त्रिशरण चौक,ऐडेड चौक,कारंजा चौक,मार्केट लाईन,जयस्तंभ चौक,ते धम्मगिरी पर्यंत हि रॅली काढण्यात आली आहे. आमदार संजय गायकवाड यांच्या मातोश्री जनसंपर्क कार्यालय जवळ कोरेगाव भीमा’ येथील रणसंग्रामात शौर्य गाजवलेल्या सर्व वीरांना आ संजय गायकवाड यांनी विनम्र अभिवादन केले.
बुलढाणा शहरातून महामानव ग्रुप च्या वतीने शौर्यदिनानिमित्य भव्य बाईक रॅली काढण्यात आली. या रॅली मध्ये असंख्य आंबेडकर अनुयायी सामील झाले होते याप्रसंगी संजय गायकवाड यांनी भीमा कोरेगाव चा खरा इतिहास विषद केला.
तसेच यावेळी सोबत युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड, शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत किसान सेना जिल्हाप्रमुख संदीप गायकवाड,सुंदरखेड सरपंच राजेश चव्हाण,महामानव ग्रुपचे सुमित गायकवाड,मल्हारी गायकवाड,गणेश राजस,स्वीय सहाय्यक श्रीकृष्णा शिंदे, यांच्यासह शिवसेना, युवासेनेचे पदाधिकारी तथा शिवसैनिक उपस्थित होते.