बुलढाण्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश…
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता प्रा. अमोल वानखेडे यांच्यासह सक्रिय सामाजिक कार्यकर्ते प्रा.अनिल रिंढे, काँग्रेसचे सोशल मीडिया विधानसभा प्रमुख अजय खोत यांचा शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश...!
बुलढाणा- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी – दि १ जानेवारी २०२४ रोजी बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय कार्यक्षम कर्तव्यदक्ष आमदार तथा शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख संजय गायकवाड यांच्या नेतृत्वाने तसेच विकासकामाच्या धडाडीने प्रेरित होऊन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ता प्राध्यापक अमोल वानखेडे यांच्यासह सामाजिक कार्यामध्ये सदैव अग्रेसर असणारे प्राध्यापक अनिल रिंढे, काँग्रेसचे सोशल मीडिया विधानसभा प्रमुख अजय खोत यांचा शिवसेना पक्षामध्ये मातोश्री जनसंपर्क कार्यालयामध्ये जाहीर पक्षप्रवेश सोहळा पार पडला,
यावेळी त्याठिकाणी युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड,शिवसेना शहर प्रमुख गजेंद्र दांदडे, शिवसेना कार्याध्यक्ष आकाश दळवी,शिवसेना जेष्ठ नेते बाळासाहेब नारखेडे,शिवसेनेचे नगरसेवक मोहन पऱ्हाड,गोविंदा खुमकर,आनंद झोटे,संजय निकम,शाम घाटे,किरण देशपांडे,विशाल शेळके, उमेश शर्मा,सागर घट्टे,चिंटू परसे,अमोल जगताप, ज्ञानेश्वर खांडवे यांच्यासह शिवसेना, युवासेनेचे पदाधिकारी तथा शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.