Homeबुलढाणा (घाटावर)बुलढाणा घाटाखाली

चिखली तालुका पत्रकार संघातर्फे ६ जानेवारीला साजरा होणार दर्पण दिन, पत्रकार संजय मोहिते, कैलास गाडेकर व छोटू कांबळे यांना पुरस्कार जाहीर….

Spread the love

चिखली( आपलं बुलढाणा जिल्‍हा बातमी) : दरवर्षी ६ जानेवारी रोजी साजरा होणारा दर्पण दिन यावर्षी देखील चिखली तालुका पत्रकार संघाच्या वतीने साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन पंचायत समितीच्या सभागृहात सकाळी ११ वाजता करण्यात आले असून सदर कार्यक्रमात पत्रकारितेच्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पत्रकारांना सन्मानित केले जाणार आहे. यामध्ये पत्रकारिता जीवनगौरव पुरस्कारासाठी बुलढाणा येथील जेष्ठ पत्रकार संजय मोहिते, शोध पत्रकारितेसाठी पुण्यनगरीचे चिखली येथील प्रतिनिधी कैलास गाडेकर व नवोदित पत्रकारांसाठी आम्ही चिखलीकर दैनिकाचे संपादक छोटू कांबळे यांची निवड करण्यात आली आहे.

चिखली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष योगेश शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या या कार्यक्रमास आ. श्वेताताई महाले, माजी आमदार राहुल बोंद्रे, माजी आमदार रेखाताई खेडेकर , शिवसेना संपर्क प्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर , तहसीलदार सुरेश कव्हळे, ठाणेदार संग्रामसिंह पाटील, नगरपालिका मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे, गटविकास अधिकारी शिवशंकर भारसाकळे, मनसे जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे , जेष्ठ नेते रामदासभाऊ देव्हडे, सामाजिक कार्यकर्ते नंदु पालवे, अमित वाधवानी, हाजी दादू सेठ , प्रा. निलेश गावंडे , सचिन बोंद्रे, आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात पत्रकारिता पुरस्कारांचे देखील वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात येईल. तरी या कार्यक्रमास तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांनी मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन चिखली तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष कमलाकर खेडेकर, सचिव तौफिक अहमद, सहसचिव इमरान शहा, संघटक नितीन फुलझाडे, कोषाध्यक्ष छोटू कांबळे यांनी केले आहे.

पुरस्कार विजेत्यांचा अल्प परिचय

संजय मोहिते

सोलापूर येथून टेक्सटाईल इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केलेल्या संजय मोहिते यांनी आपल्या पत्रकारितेचा प्रारंभ १९९२ मध्ये लोकसत्ता व इंडियन एक्सप्रेस या मराठी व इंग्रजी दैनिकांपासून केला. त्यानंतर लोकमत बुलढाणा उप संपादक व वाशीम जिल्हा प्रतिनिधी नंतर तिथेच मातृभूमी वाशीम जिल्हा प्रतिनिधी म्हणून जबाबदाऱ्या पार पाडल्या. पुढे बुलढाणा येथे पुण्यनगरी उप संपादक व बुलडाणा लाईव्ह विशेष प्रतिनिधी म्हणून कार्य केले. सध्या ते लोकसत्ता दैनिकाचे बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. ते राजकारण, ग्रामपंचायत व लोकसभा निवडणूकांचे गाढे अभ्यासक असून समाजकारण, प्रशासकीय, मानवीय मूल्य असलेल्या बातम्या, शोध पत्रकारिता यावर मोहिते यांचा विशेष भर असतो. आजवर पत्रकारिता क्षेत्रामध्ये विशेष कामगिरीबद्धल १० विविध संस्था व संघटनांचे पुरस्कार त्यांना प्राप्त झाले असून संजय मोहिते यांचे काश्मीर समस्यांवरील पुस्तक प्रकाशित झाले असून अनेक नवोदित पत्रकारांना मार्गदर्शन करून त्यांनी घडवले आहे.

कैलास गाडेकर

कैलास गाडेकर यांनी बी ए ची पदवी प्राप्त केल्यानंतर सन १९९ ९ मध्ये या अकोला येथून प्रकाशित होणाऱ्या दैनिक नवयुगवाणी या दैनिकापासून आपल्या पत्रकारितेची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील मापदंड या दैनिकासाठी वार्तांकन सुरू केले. पुढे अकोल्यातीलच मातृभूमी दैनिकाचे शहर प्रतिनिधी म्हणून ते रुजू झाले. २००५ मध्ये सकाळ दैनिकासाठी आणि पुढे त्यानंतर २००७ मध्ये पुण्यनगरीचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी कार्य सुरू केले, जे आजपर्यंत सुरूच आहे. यादरम्यान त्यांची चिखली तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी देखील सर्वानुमते निवड करण्यात आली, शोध पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातल्या समस्यांनी वाचा फोडणाऱ्या व प्रशासनातील अनेक त्रुटी उजागर करणाऱ्या शोध बातम्या प्रकाशित केल्या आहेत.

छोटू कांबळे

छोटू कांबळे यांच्या पत्रकारितेची सुरुवात मुंबई येथून प्रकाशित होणाऱ्या साप्ताहिक सम्राट शासन या वृत्तपत्रातून २०१३ साली झाली. इयत्ता १२ वी पर्यंत शिक्षण झालेल्या छोटू कांबळे यांनी त्यानंतर सीसीएन न्यूज, विदर्भ दर्पण प्रतिनिधी म्हणून काही महिने काम केले. २०१६ मध्ये वयाच्या केवळ १९ व्या वर्षी साप्ताहिक एक नजर या साप्ताहिकाची सुरुवात केली. एवढ्या लहान वयात संपादक म्हणून भूमिका निभावणारे कदाचित ते जिल्ह्यातील एकमेव पत्रकार ठरावेत. पुढे सन २०१८ पासून दैनिक आम्ही चिखलीकर नावाचं सायमन दैनिक कांबळे यांनी सुरू केले. त्यांना छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी राज्यस्तरीय दलित मित्र पत्रकार पुरस्कार, मेहकर येथे जिल्हास्तरीय भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मूकनायक पुरस्कार, साखरखेर्डा येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट पत्रकारिता जिल्हास्तरीय पुरस्कार तर सामाजिक कार्याबद्दल समाजभूषण पुरस्कार प्राप्त झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page