वृद्धाश्रमातील वृद्धासोबत वाढदिवस साजरा करीत केली आर्थिक मदत
चिखली -: आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- अंत्री कोळी येथील प्रतिष्टीत सामाजिक युवा नेते समाधान हिवाळे यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत तुकाराम आश्रय वृद्धाश्रमातील बेवारस निराधार बेघर वृद्धासोबत आपला वाढदिवस साजरा केला.
भोकर येथे तुकाराम आश्रय वृद्धाश्रम च्या माध्यमातून गेल्या एक वर्षांपासून बेवारस निराधार बेघर असे वयोवृद्ध आजिआजोबांची निःस्वार्थ पणे मोफत सेवा देणे सुरु आहे. त्या वृद्धाच्या हस्ते औक्षण करून आशीर्वाद घेतला आपला वाढदिवस साजरा करून वृद्धाश्रमाच्या बांधकाम साठी पाच हजार रुपये आर्थिक मदत करून आजच्या युवा पिढी समोर एक आदर्श निर्माण केला आहे.
यावेळी कार्यक्रम चे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते अजीज जमादार हे होते तर प्रमुख उपस्थितीत पत्रकार महेंद्र हिवाळे, सवणा चे उपसरपंच कय्युम शाह, सै मोसिन सर, अजय हीवाळे, अमोल हीवाळे, सिद्धार्थ हिवाळे, सदीप इंगळे हे होते. तुकाराम आश्रय वृद्धाश्रम चे संचालक प्रशांत डोंगरदिवे यांनी त्यांचे आभार व्यक्त करीत सूत्रसंचालन केले तर आभार सौं रुपाली डोंगरदिवे यांनी केले.